• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागांवर विजय; धीरज देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन

उदगीर / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील आदर्श आणि नामांकित सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या पॅनलचे प्रमुख आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार धीरज देशमुख यांनी आज दुपारी सर्व विजयी उमेदवार व सहकाऱ्यांसह बाभळगाव येथील निवासस्थानी उपस्थित राहून सर्वांचे कौतुक केले आणि मनःपूर्वक अभिनंदन केले.

RelatedPosts

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

सहकार महर्षी तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि राज्याचे विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, बँकेचे विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने हा विजय संपादन केला. हा विजय बँकेच्या पारदर्शक, विश्वासार्ह आणि विकासाभिमुख कारभाराला सभासदांनी दिलेली भक्कम पावती असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. चांगले काम केल्यास जनता पाठीशी खंबीरपणे उभी राहते, हे या निकालातून स्पष्ट झाल्याचेही सांगण्यात आले.

हा विजय केवळ एका पॅनलचा नसून सहकाराच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सभासदाचा, शेतकऱ्याचा आणि सहकार चळवळीशी जोडलेल्या सर्व घटकांचा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. लातूर जिल्हा बँकेची प्रगतीची परंपरा अधिक सक्षम करण्यासाठी आणि सहकारातून समृद्धीचे स्वप्न साकार करण्यासाठी हा विजय नवी ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या विजयातून मिळालेल्या ऊर्जेच्या बळावर सहकार पॅनलचे विजयी उमेदवार सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी काळानुरूप नवनवीन योजना राबवतील आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

धीरज देशमुख यांनी सहकार पॅनलमधील सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच सर्व सभासद, मतदार, निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रचारासाठी परिश्रम घेणारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

यावेळी लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह जिल्हाभरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Mude Kamlakar
Previous Post

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

Next Post

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

Related Posts

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी
ताज्या घडामोडी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026
1

5
अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

November 16, 2026
4
पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन
ताज्या घडामोडी

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

November 16, 2026
4
सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

November 16, 2026
7
आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
ताज्या घडामोडी

आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

November 16, 2026
20
Next Post
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

ताज्या बातम्या

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

November 16, 2026
मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In