• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

जलजीवन मिशनचे कोट्यवधी रुपये खर्चूनही पाणीपुरवठा ठप्प? सावरगाव, आलेगाव, सोनुना यांसह सात गावांत भीषण टंचाई

पातूर : पातूर तालुक्यातील सावरगाव, आलेगाव, गोळेगाव, पिंपळडोळी आणि सोनुना यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावांमधील बोअरवेल आणि विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिला, वृद्ध आणि लहान मुलांना वणवण भटकावे लागत आहे. मात्र, प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) आलेगाव सर्कल प्रमुख निलेश तोताराम कापकर यांनी केला आहे.

RelatedPosts

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन

या समस्येबाबत कापकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले आहे. सावरगाव, आलेगाव, गोळेगाव, पिंपळडोळी आणि सोनुना या गावांमध्ये तातडीने विहिरींचे अधिग्रहण करून टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत सोनुना, सावरगाव, गोळेगाव, आलेगाव, कार्ला, पिंपळडोळी आणि पाडशिंगी या गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. योजनेची कामे निकृष्ट दर्जाची आणि अपूर्ण असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

केवळ कागदोपत्री अहवाल न मागवता स्वतंत्र तांत्रिक समिती नेमून संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करावी आणि कामांमध्ये दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कापकर यांनी केली आहे.

सावरगाव आणि आलेगाव येथे ग्रामसेवक महिनाभरापासून गैरहजर असल्याने ग्रामस्थांची विविध कामे खोळंबली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून अद्याप विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था न केल्यास बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ‘मडके फोडो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निलेश कापकर यांनी दिला आहे.

‘पिण्याचे पाणी ही मूलभूत गरज आहे. योजना कागदावर पूर्ण दाखवून काय उपयोग, जर घरापर्यंत पाणीच येत नसेल? प्रशासनाने आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृती करावी,’ असा सवाल कापकर यांनी उपस्थित केला आहे.

Ad 1
Tags: Pradip Tajne
Previous Post

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

Next Post

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

Related Posts

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

November 16, 2026
4
आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
ताज्या घडामोडी

आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

November 16, 2026
18
मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन
ताज्या घडामोडी

मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन

November 16, 2026
3
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ
ताज्या घडामोडी

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ

November 16, 2026
4
गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका
ताज्या घडामोडी

गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका

November 16, 2026
42
पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट
ताज्या घडामोडी

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

November 16, 2026
4
Next Post
सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 16, 2026
पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

November 16, 2026
सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In