• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

ढोल-बासरीच्या तालावर नृत्याचा ठेका; आदिवासी लोकसंस्कृतीचे अनोखे दर्शन

धारणी / प्रतिनिधी : मेळघाटात दिवाळीचा सण संपताच पारंपरिक ‘घुंगरू बाजाराची’ धूम सुरू झाली आहे. गावोगावी भरू लागलेल्या या बाजारांमुळे संपूर्ण मेळघाटात आदिवासी लोकसंस्कृतीचा अनोखा आविष्कार पाहायला मिळत आहे. ढोल, बासरी आणि मुरळीच्या सुरांवर पारंपरिक थाट्या नृत्याचा ठेका धरत आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने या उत्सवात सहभागी होत आहेत.

RelatedPosts

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

मेळघाटातील गोंड समाजाच्या लोकजीवनात थाट्या नृत्याला विशेष महत्त्व आहे. ही परंपरा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली लोककला आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, पायांत घुंगरू आणि हातात पारंपरिक काठ्या घेऊन युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण या नृत्यात सहभागी होतात.

दिवाळीनंतर आठवडी बाजाराच्या दिवशी सकाळपासूनच थाट्या नृत्याचे समूह ढोल, बासरी आणि मुरळीच्या तालावर गावोगावी फेरी काढतात. घरांसमोर, दुकानांसमोर तसेच शेतशिवारात जाऊन हे कलाकार पारंपरिक नृत्य सादर करतात. त्यांच्या पायांतील घुंगरांचा नाद आणि वाद्यांचे सूर यामुळे गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

विशेष म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या पारंपरिक नृत्याचा आनंद घेतात. नृत्याच्या फेऱ्यांदरम्यान ग्रामस्थांकडून कलाकारांना धान्य आणि आर्थिक स्वरूपात मदत दिली जाते. मात्र, यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित पीक उत्पादन मिळालेले नाही. हाताला पुरेसा रोजगार नसल्याने आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आर्थिक ओढाताण होत असल्याने अनेक आदिवासी बांधवांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरीही घुंगरू बाजाराच्या पारंपरिक उत्सवात त्यांचा सहभाग कायम आहे.

आजच्या आधुनिक युगात अनेक पारंपरिक कला लोप पावत असताना मेळघाटातील घुंगरू बाजाराने आपली स्वतंत्र ओळख टिकवून ठेवली आहे. हा बाजार केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून आदिवासी समाजाचे जीवनमान, श्रद्धा, कला, परंपरा आणि सामूहिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा महत्त्वपूर्ण वारसा आहे.

मेळघाटातील या अनमोल लोकपरंपरेचे जतन करणे, तिचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि पारंपरिक कलाकारांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज बनली आहे.

Ad 1
Tags: Rajnish Sakle
Previous Post

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

November 16, 2026
3
पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन
ताज्या घडामोडी

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

November 16, 2026
1
सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

November 16, 2026
6
आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
ताज्या घडामोडी

आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

November 16, 2026
18
मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन
ताज्या घडामोडी

मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन

November 16, 2026
3
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ
ताज्या घडामोडी

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ

November 16, 2026
4

ताज्या बातम्या

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

November 16, 2026
अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

November 16, 2026
सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In