• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार; उसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर देण्याची मागणी

कोळपेवाडी / प्रतिनिधी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अहिल्यानगर जिल्ह्यात आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या २३ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेचे पदाधिकारी रविंद्र मोरे, सुरेश टाके आणि अभिजीत पोटे यांनी ही भूमिका मांडली.

RelatedPosts

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

साखरेचे दर प्रतिकिलो ५४ रुपयांपर्यंत पोहोचले असतानाही साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे उसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर मिळावा, ही या आंदोलनातील प्रमुख मागणी आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलेला प्रतिटन ३,१४९ रुपयांचा दर संघटनेने अमान्य केला आहे. जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे सुमारे ३०० कोटी रुपये लुटले जात असल्याचा गंभीर आरोपही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला साखर कारखान्यांचे अध्यक्ष उपस्थित राहिले नसल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यासाठी साधी खोलीही उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी जमिनीवर बसून प्रशासनाचा निषेध नोंदविला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे सांगत, उसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर मिळाल्याशिवाय आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा ठाम इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरच्या मोर्चाकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Nivratti Pagar
Previous Post

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

Related Posts

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन
ताज्या घडामोडी

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

November 16, 2026
1
सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

November 16, 2026
5
आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
ताज्या घडामोडी

आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

November 16, 2026
18
मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन
ताज्या घडामोडी

मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन

November 16, 2026
3
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ
ताज्या घडामोडी

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ

November 16, 2026
4
गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका
ताज्या घडामोडी

गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका

November 16, 2026
42

ताज्या बातम्या

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

November 16, 2026
सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 16, 2026
पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In