• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

भाट्ये बीच आणि झरी विनायक मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम; देशभरातील ९ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग

रत्नागिरी | प्रतिनिधी

मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या रत्नागिरी शोरूमच्या वतीने भाट्ये बीच आणि झरी विनायक मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका व नगरपालिका यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

दापोलीत घरफोडी; बेडच्या कप्प्यातील १ लाख ६६ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

कोयना जलाशयाची पाणीपातळी घटली; पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीवर संकटाचे संकेत

पिंपरी-चिंचवड न्यायालयातील कामकाजावर संपाचे सावट; न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर

या स्वच्छता मोहिमेत मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या व्यवस्थापनातील अधिकारी, शोरूम प्रमुख, कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्रितपणे परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपली.

पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि सुशासन (ESG) या तत्त्वांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मलाबार ग्रुपच्या वतीने या महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील मलाबार ग्रुपच्या ९ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

यावेळी मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, “पर्यावरणाप्रती जबाबदारी, सामाजिक बांधिलकी, पारदर्शकता आणि नैतिक व्यावसायिक प्रशासन या मूल्यांचा व्यावसायिक कार्यपद्धतीत समावेश करून ESG तत्त्वांना अधिक बळकटी देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. पर्यावरणीय शाश्वततेच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून येत्या वर्षभरात देशभरात सुमारे एक लाख वृक्षांची लागवड करण्याचे ग्रुपचे उद्दिष्ट आहे.”

व्यावसायिक कार्यासोबतच मलाबार ग्रुप समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहे. यामध्ये ‘हंगर फ्री वर्ल्ड’ हा भूकमुक्ती उपक्रम, वंचित मुलांसाठी मायक्रो लर्निंग सेंटर्स, मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच ज्येष्ठ महिलांसाठी ‘ग्रँडमा होम्स’ यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व आणि शाश्वत विकासाप्रती ग्रुपची बांधिलकी अधोरेखित होते.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची स्थापना १९९३ मध्ये झाली असून, ही मलाबार ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. मलाबार ग्रुप हा भारतातील अग्रगण्य आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेला व्यावसायिक समूह आहे. ९.४१ अब्ज अमेरिकी डॉलरच्या वार्षिक उलाढालीसह मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ही जागतिक स्तरावरील चौथ्या क्रमांकाची मोठी ज्वेलरी रिटेल कंपनी असल्याचे कंपनीच्या माहितीत नमूद आहे.

कंपनीचे १४ देशांमध्ये ४५० हून अधिक शोरूम्सचे विस्तृत रिटेल नेटवर्क आहे. भारत, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व व पूर्व आशिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे कंपनीची कार्यालये, डिझाइन सेंटर्स, घाऊक विक्री केंद्रे तसेच उत्पादन सुविधा कार्यरत आहेत.

३,५०० हून अधिक भागधारकांच्या मालकीच्या या ग्रुपमध्ये २६ हून अधिक देशांतील ३० हजारांपेक्षा जास्त व्यावसायिक कार्यरत असून, त्यांच्या योगदानातून ग्रुपच्या सातत्यपूर्ण विकासाला चालना मिळत आहे.

Ad 1
Tags: Dr. Prashant Paranjape
Previous Post

कोयना जलाशयाची पाणीपातळी घटली; पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीवर संकटाचे संकेत

Next Post

दापोलीत घरफोडी; बेडच्या कप्प्यातील १ लाख ६६ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

Related Posts

क्राईम

दापोलीत घरफोडी; बेडच्या कप्प्यातील १ लाख ६६ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

November 18, 2026
0
कोयना जलाशयाची पाणीपातळी घटली; पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीवर संकटाचे संकेत
ताज्या घडामोडी

कोयना जलाशयाची पाणीपातळी घटली; पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीवर संकटाचे संकेत

November 18, 2026
0
पिंपरी-चिंचवड न्यायालयातील कामकाजावर संपाचे सावट; न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवड न्यायालयातील कामकाजावर संपाचे सावट; न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर

November 18, 2026
4
मनमाडच्या ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाला ७५ वर्षे पूर्ण
ताज्या घडामोडी

मनमाडच्या ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाला ७५ वर्षे पूर्ण

November 18, 2026
3
मेहकर न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू; समान वेतनासाठी आंदोलन तीव्र
ताज्या घडामोडी

मेहकर न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू; समान वेतनासाठी आंदोलन तीव्र

November 17, 2026
20
कार्तिकी वारीसाठी पंढरी सज्ज! विठुरायाच्या दर्शनासाठी १४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान अहोरात्र सुविधा
ताज्या घडामोडी

कार्तिकी वारीसाठी पंढरी सज्ज! विठुरायाच्या दर्शनासाठी १४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान अहोरात्र सुविधा

November 17, 2026
16
Next Post

दापोलीत घरफोडी; बेडच्या कप्प्यातील १ लाख ६६ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

ताज्या बातम्या

दापोलीत घरफोडी; बेडच्या कप्प्यातील १ लाख ६६ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

November 18, 2026
मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान

मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान

November 18, 2026
कोयना जलाशयाची पाणीपातळी घटली; पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीवर संकटाचे संकेत

कोयना जलाशयाची पाणीपातळी घटली; पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीवर संकटाचे संकेत

November 18, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In