• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मेहकर न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू; समान वेतनासाठी आंदोलन तीव्र

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
मेहकर न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू; समान वेतनासाठी आंदोलन तीव्र
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी; दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही निर्णय नसल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मेहकर | प्रतिनिधी

मेहकर येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी वेतनविषयक मागण्यांसाठी संप पुकारला असून, समान वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले आहे. सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणेच दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही वेतन मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

RelatedPosts

कार्तिकी वारीसाठी पंढरी सज्ज! विठुरायाच्या दर्शनासाठी १४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान अहोरात्र सुविधा

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठांतील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. मात्र, कनिष्ठ न्यायालयांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. जानेवारी २०२५ मध्ये तत्कालीन उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांतील सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. मात्र, त्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांपासून कर्मचारी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. यापूर्वी दोन वेळा काळ्या फिती लावून आंदोलनही करण्यात आले होते. मात्र, मागण्यांबाबत समाधानकारक निर्णय न झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी संपाचे पाऊल उचलले आहे.

यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही न्यायालयीन कर्मचारी आमची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो. कामात कोणतीही कमतरता राहू देत नाही. आमचा कोणालाही विरोध नाही किंवा कोणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही. केवळ आमच्याशी चर्चा करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. वारंवार आश्वासने देऊनही मागण्यांवर निर्णय होत नसल्याने आमच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आज सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.”

या आंदोलनात महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, या मागण्यांबाबत शासन आणि न्याय प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

कार्तिकी वारीसाठी पंढरी सज्ज! विठुरायाच्या दर्शनासाठी १४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान अहोरात्र सुविधा

Related Posts

कार्तिकी वारीसाठी पंढरी सज्ज! विठुरायाच्या दर्शनासाठी १४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान अहोरात्र सुविधा
ताज्या घडामोडी

कार्तिकी वारीसाठी पंढरी सज्ज! विठुरायाच्या दर्शनासाठी १४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान अहोरात्र सुविधा

November 17, 2026
5
नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान
ताज्या घडामोडी

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; लाखोंचे नुकसान

November 17, 2026
4
कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल
ताज्या घडामोडी

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

November 17, 2026
90
मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा
ताज्या घडामोडी

मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

November 17, 2026
21
कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’
ताज्या घडामोडी

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

November 16, 2026
7
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी
ताज्या घडामोडी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026
4

ताज्या बातम्या

मेहकर न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू; समान वेतनासाठी आंदोलन तीव्र

मेहकर न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू; समान वेतनासाठी आंदोलन तीव्र

November 17, 2026
कार्तिकी वारीसाठी पंढरी सज्ज! विठुरायाच्या दर्शनासाठी १४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान अहोरात्र सुविधा

कार्तिकी वारीसाठी पंढरी सज्ज! विठुरायाच्या दर्शनासाठी १४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान अहोरात्र सुविधा

November 17, 2026
पाचल येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

पाचल येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

November 17, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In