• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

पालखी व रथातून देवांची गावातून मिरवणूक; बैलगाडा शर्यत, कुस्तीचे मैदान, लोकनाट्य तमाशा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

निमसोड | प्रतिनिधी :

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निमसोड येथे ग्रामदैवत सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीची पारंपरिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या यात्रेनिमित्त भव्य रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सिद्धनाथ व जोगेश्वरी देवांच्या पालखीची तसेच रथातून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

RelatedPosts

“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

दापोलीत घरफोडी; बेडच्या कप्प्यातील १ लाख ६६ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान

या यात्रेला महाराष्ट्रातील विविध भागांसह परराज्यांत व्यवसाय व कामानिमित्त स्थायिक झालेले गलाई बांधव तसेच निमसोड परिसरातील भाविक आवर्जून उपस्थित राहतात. आपल्या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी अनेकजण दरवर्षी गावी येत असतात. त्यामुळे यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यात्रेनिमित्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दोन ते तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये बैलगाडा शर्यत, कुस्तीचे जंगी मैदान, कमल-वनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम, लावणी कार्यक्रम, अखंड हरिनाम सप्ताह आणि काल्याचे कीर्तन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

सिद्धनाथ व जोगेश्वरी देवांची पालखी आणि रथातून निघणारी भव्य मिरवणूक हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. दूरवरून तसेच परिसरातील गावांतून येणारे भाविक देवदर्शनासाठी गर्दी करतात. अनेक भाविक देवाच्या चरणी श्रद्धेनुसार रक्कम अर्पण करतात.

यात्रेच्या काळात मिठाई विक्रेते, खेळणी विक्रेते, आकाशपाळणे तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळांचे स्टॉल लावणारे व्यावसायिक मोठ्या संख्येने दाखल होतात. मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा फटका या व्यावसायिकांनाही बसताना दिसत आहे. यात्रेतील गर्दी आणि व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवत असल्याचे चित्र आहे.

धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारी सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रा निमसोडकरांसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्रेचे नियोजन करण्यात येत असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Ad 1
Tags: Nitin Rathod
Previous Post

“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

Related Posts

“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी
ताज्या घडामोडी

“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

November 18, 2026
2
क्राईम

दापोलीत घरफोडी; बेडच्या कप्प्यातील १ लाख ६६ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

November 18, 2026
1
मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान
ताज्या घडामोडी

मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान

November 18, 2026
0
कोयना जलाशयाची पाणीपातळी घटली; पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीवर संकटाचे संकेत
ताज्या घडामोडी

कोयना जलाशयाची पाणीपातळी घटली; पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीवर संकटाचे संकेत

November 18, 2026
0
पिंपरी-चिंचवड न्यायालयातील कामकाजावर संपाचे सावट; न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवड न्यायालयातील कामकाजावर संपाचे सावट; न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर

November 18, 2026
4
मनमाडच्या ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाला ७५ वर्षे पूर्ण
ताज्या घडामोडी

मनमाडच्या ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाला ७५ वर्षे पूर्ण

November 18, 2026
18

ताज्या बातम्या

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

November 18, 2026
“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

November 18, 2026
दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन

दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन

November 18, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In