• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांची रणनीती यशस्वी; राष्ट्रवादी-शिवसेनेने एकत्र येत भाजपला सत्तेबाहेर ठेवले

सातारा | दि. १८ नोव्हेंबर

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार, या चर्चेला पूर्णविराम देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्हा बँकेतील सत्तेचे समीकरण बदलले आहे.

RelatedPosts

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

दापोलीत घरफोडी; बेडच्या कप्प्यातील १ लाख ६६ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत समन्वय साधल्याचे चित्र आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्रित रणनीती आखत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यात यश मिळवले.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी भाजपचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि शिवसेनेचे ४ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

या निवडणुकीनंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच बँकेचा अध्यक्ष कोण होणार, याचा निर्णय घेतील, असे वक्तव्य केले होते. मात्र, अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक पातळीवर आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून व्हावा, अशी भूमिका शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी घेतल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा आणि बैठका झाल्या. त्यातून समन्वयाचा मार्ग काढत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अध्यक्षपदासाठी, तर शिवसेनेकडून दीपक चव्हाण यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेत दोघांचीही निवड जाहीर करण्यात आली.

दरम्यान, भाजपच्या नवनियुक्त संचालकांची बैठक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर झाल्याची माहिती आहे. मात्र, या बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी आवश्यक राजकीय समीकरण जुळवण्यात भाजपला यश आले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत केलेल्या या राजकीय खेळीमुळे सातारा जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे भाजपच्या हातात जाण्याची शक्यता संपुष्टात आली. या निवडीची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Ad 1
Tags: Swapnil Patil
Previous Post

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

Related Posts

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल
ताज्या घडामोडी

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

November 18, 2026
7
“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी
ताज्या घडामोडी

“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

November 18, 2026
10
क्राईम

दापोलीत घरफोडी; बेडच्या कप्प्यातील १ लाख ६६ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

November 18, 2026
4
मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान
ताज्या घडामोडी

मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान

November 18, 2026
2
कोयना जलाशयाची पाणीपातळी घटली; पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीवर संकटाचे संकेत
ताज्या घडामोडी

कोयना जलाशयाची पाणीपातळी घटली; पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीवर संकटाचे संकेत

November 18, 2026
4
पिंपरी-चिंचवड न्यायालयातील कामकाजावर संपाचे सावट; न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवड न्यायालयातील कामकाजावर संपाचे सावट; न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर

November 18, 2026
6

ताज्या बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण

November 18, 2026
निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

November 18, 2026
“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

November 18, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In