• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

केज येथे वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सुरू; २४८ शिक्षकांचा सहभाग, २० सुलभकांकडून मार्गदर्शन

केज | प्रतिनिधी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने केज तालुक्यातील पात्र शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. साने गुरुजी निवासी विद्यालय, धारूर रोड, केज येथे दि. १३ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दहा दिवसांचे प्रशिक्षण सुरू आहे.

RelatedPosts

केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

या प्रशिक्षणादरम्यान डायटचे प्राचार्य डॉ. अनिल मुरकुटे आणि अधिव्याख्याता डॉ. राजेश गोरे यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या विविध गटांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना डॉ. अनिल मुरकुटे म्हणाले की, विविध प्रशिक्षणांमधून शिक्षक समृद्ध होत असतो. हे प्रशिक्षण केवळ वेतनश्रेणीतील वाढीसाठी नसून, राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात शिक्षक अधिक सक्षमपणे योगदान देऊ शकेल, यासाठीही महत्त्वाचे आहे. शिक्षण क्षेत्रात सातत्याने होत असलेले नवनवीन बदल शिक्षकांनी आत्मसात करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या कार्यात सातत्य आणि गुणवत्ता निर्माण व्हावी, यासाठी अशा प्रशिक्षणांची गरज असते.

शाळेत शिकवणे हे शिक्षकाचे कर्तव्य असले, तरी ती राष्ट्रनिर्मितीसाठी स्वतः स्वीकारलेली सेवा आहे. ही सेवा करण्याची संधी शिक्षकांना मिळाली असून, त्या संधीचे सोने करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रशिक्षणामुळे वेतनात वाढ होणार असली, तरी आपण करत असलेली शैक्षणिक सेवा अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडल्याचे समाधान अधिक मोलाचे आहे. हे समाधान कोणत्याही गोष्टीत मोजता येणार नाही. राष्ट्रनिर्मितीच्या महान कार्यात प्रत्येक शिक्षकाचा महत्त्वाचा वाटा असतो, असे प्रतिपादनही डॉ. मुरकुटे यांनी केले.

साने गुरुजी संकुलात सुरू असलेल्या या प्रशिक्षणात एकूण २४८ शिक्षक सहभागी झाले असून, २० सुलभक त्यांना प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणाचे नियोजन शिस्तबद्ध आणि उत्तम पद्धतीने सुरू असल्याबद्दल डॉ. मुरकुटे यांनी समाधान व्यक्त केले आणि सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

यावेळी डायटचे अधिव्याख्याता डॉ. राजेश गोरे, साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता कराड, संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव कराड आणि प्रशिक्षण समन्वयक तथा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे उपस्थित होते.

Ad 1
Tags: Kamlakar Sonawane
Previous Post

केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

Related Posts

केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा
ताज्या घडामोडी

केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

November 18, 2026
0
सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण
ताज्या घडामोडी

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण

November 18, 2026
13
निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल
ताज्या घडामोडी

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

November 18, 2026
7
“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी
ताज्या घडामोडी

“आमचा परिसर, आमचा हक्क!” दुर्गंधीयुक्त कचरा कायमस्वरूपी हटवा; अमोल भागवत यांची मागणी

November 18, 2026
10
क्राईम

दापोलीत घरफोडी; बेडच्या कप्प्यातील १ लाख ६६ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

November 18, 2026
4
मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान
ताज्या घडामोडी

मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान

November 18, 2026
2

ताज्या बातम्या

प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे

प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे

November 18, 2026
केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

November 18, 2026
सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण

November 18, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In