• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुष्काळी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
दुष्काळी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी ११ हजारांऐवजी २२ हजार रुपये मदत द्यावी; तळेगाव डवला परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

तेल्हारा | प्रतिनिधी : तेल्हारा तालुक्यातील तळेगाव डवला परिसरात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारी मदत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने दुष्काळी मदतीच्या रकमेत तातडीने वाढ करून ती एकरकमी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

RelatedPosts

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. दत्तात्रय वाघ यांची नियुक्ती

तीर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज आमळी यात्रोत्सवाला शनिवारपासून भव्य सुरुवात

एरंडोल येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पूर्णा नदी, विहिरी आणि बोअरवेल कोरडे पडले आहेत. परिणामी भूजल पातळीतही मोठी घट झाली असून शेतीसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीत जाहीर करण्यात आलेली मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शासनाने जाहीर केलेली पाच हजार ते दोन हजार रुपयांची मदत म्हणजे, “आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी ११ हजार रुपयांऐवजी २२ हजार रुपये मदत द्यावी, तळेगाव डवला परिसराला हंगामी बागायत क्षेत्र म्हणून संबोधण्यात यावे आणि दुष्काळी मदत एकरकमी देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

याबाबत शेतकरी कैलास पाटील शेजोळे (रा. गौळखेड, ह.मु. तळेगाव डवला, ता. तेल्हारा, जि. अकोला) यांनी शासनाने मदतीत वाढ करण्याची मागणी केली आहे.

दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Ad 1
Tags: Tejrao Raut
Previous Post

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. दत्तात्रय वाघ यांची नियुक्ती

Related Posts

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. दत्तात्रय वाघ यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. दत्तात्रय वाघ यांची नियुक्ती

November 20, 2026
0
तीर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज आमळी यात्रोत्सवाला शनिवारपासून भव्य सुरुवात
ताज्या घडामोडी

तीर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज आमळी यात्रोत्सवाला शनिवारपासून भव्य सुरुवात

November 20, 2026
0
एरंडोल येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू
ताज्या घडामोडी

एरंडोल येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

November 20, 2026
0
औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका
ताज्या घडामोडी

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

November 20, 2026
0
ताज्या घडामोडी

निलंगा तालुक्यात रबी पेरणी केवळ ३ टक्के; शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे आव्हान

November 20, 2026
3
शिर्डीत रंगणार ७० वी राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा
ताज्या घडामोडी

शिर्डीत रंगणार ७० वी राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा

November 20, 2026
3

ताज्या बातम्या

दुष्काळी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

दुष्काळी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

November 20, 2026
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. दत्तात्रय वाघ यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. दत्तात्रय वाघ यांची नियुक्ती

November 20, 2026
तीर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज आमळी यात्रोत्सवाला शनिवारपासून भव्य सुरुवात

तीर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज आमळी यात्रोत्सवाला शनिवारपासून भव्य सुरुवात

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In