• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निलंगा तालुक्यात रबी पेरणी केवळ ३ टक्के; शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे आव्हान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सरासरी ५३ हजार ३४३ हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ १ हजार ५७८ हेक्टरवर पेरणी; दुष्काळामुळे जलस्रोतांची पाणीपातळी खालावली

निलंगा | प्रतिनिधी :

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने निलंगा तालुक्यातील शेतीचे अर्थकारण कोलमडले असून, रबी हंगामावरही दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जलस्रोतांची पाणीपातळी खालावली आहे. परिणामी, रबी हंगामाच्या सुरुवातीलाच पेरणीचा वेग मंदावला आहे. तालुक्यात रबी पिकांचे सरासरी क्षेत्र ५३ हजार ३४३ हेक्टर असताना आतापर्यंत केवळ १ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या अवघ्या तीन टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी एन. आर. शिंदे यांनी दिली.

RelatedPosts

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

शिर्डीत रंगणार ७० वी राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा

सिंधुदुर्गच्या काजू, सुपारीला मिळणार गोव्याची हक्काची बाजारपेठ

दुष्काळातही शेतकऱ्यांनी आशा सोडू नये

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर शेती टिकविण्याबरोबरच पशुधन जगविण्याचेही मोठे आव्हान आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचे नियोजन यावरच रबी हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी संकटाला न घाबरता बदलत्या परिस्थितीनुसार शेती पद्धतीत बदल करावा, असे आवाहन छावा संघटनेचे निलंगा तालुकाध्यक्ष तथा शेतकरी तुळशीदास साळुंके यांनी केले.

तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊनच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे, त्यांनी हरभरा पिकाला प्राधान्य द्यावे. तर कमी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी करडी, जवस आणि ज्वारी यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी, असे मार्गदर्शन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

थेंब थेंब पाण्याचा वापर करा!

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि रेनपाइप यांसारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर वाढवून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा. शेतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत असल्याने चारा उपलब्ध होईल, अशा पिकांना प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Ad 1
Tags: Vilas Patil
Previous Post

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

Next Post

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

Related Posts

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका
ताज्या घडामोडी

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

November 20, 2026
0
शिर्डीत रंगणार ७० वी राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा
ताज्या घडामोडी

शिर्डीत रंगणार ७० वी राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा

November 20, 2026
1
सिंधुदुर्गच्या काजू, सुपारीला मिळणार गोव्याची हक्काची बाजारपेठ
ताज्या घडामोडी

सिंधुदुर्गच्या काजू, सुपारीला मिळणार गोव्याची हक्काची बाजारपेठ

November 20, 2026
2
विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू; वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
ताज्या घडामोडी

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू; वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर नागरिकांचे प्रश्नचिन्ह

November 20, 2026
23
माजलगावच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू
ताज्या घडामोडी

माजलगावच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू

November 20, 2026
10
इंदिरा गांधी जयंतीनिमित्त खात येथे पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन
ताज्या घडामोडी

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त खात येथे पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन

November 20, 2026
0
Next Post
औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

ताज्या बातम्या

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

November 20, 2026

निलंगा तालुक्यात रबी पेरणी केवळ ३ टक्के; शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे आव्हान

November 20, 2026
दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In