
विहिरगाव प्रतिनिधी
पांढरकवडा येथे दिनांक ४/१०/२४ रोजी पांढरकवडा तहसिल कार्यालयावर पांढरकवडा तालुका शेतकरी संघर्ष समिती व पांढरकवडा तालुका काँग्रेस कमिटी घ्या वतीने शेतकऱ्यांच्या विराट मोर्चा काढण्यात आला यावेळी आधारभूत किंमत योजने अंतर्गत शेतमालाची खरेदी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत, कापुस व सोयाबीन या शेतीमालाची शासकिय खरेदी केंद्रे दसऱ्यांच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्यात यावे.
अश्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार पांढरकवडा यांच्या मार्फत देण्यात आले . यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून
निष्ठुर, निर्दयी, अत्याचारी, महागाई , शेतकरी, बेरोजगारांना गाजर दाखविणाऱ्या, धोकेबाज, खोकेबाज,सरकारच्या विरोधात टीका केली.
यावेळी मोर्चाचे नेतृत्व मा.खासदार संजय देशमुख,मा.प्रा.वसंतराव पुरके माजी शिक्षणमंत्री , संध्याताई संव्वालाखे प्रदेशाध्यक्षा महिला काँग्रेस कमिटी,प्रफुलभाऊ मानकर जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, जितेंद्र मोघे,सिकंदर शाहा,निमेश मानकर,विजय तेलंगे, अंकुश मुनेश्वर,किरण कुमरे,प्रविण देशमुख , राजेंद्र गायकवाड,सौ.वर्षाताई निकम , किशोर इंगळे,
अरविंद वाढोणकर , सौ.संध्याताई बोबडे जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस ,अमर पाटील चालबर्डीकर अध्यक्ष पांढरकवडा तालुका काँग्रेस कमिटी, विजय तेलंगे अध्यक्ष पांढरकवडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, तिरुपती कुंदकुरीवार तालुकाप्रमुख शिवसेना उबाठा, तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post