

“मंगेश दादाच्या वडापावची चवच भारी”
कालिवली येथील जरीमरी आई वडापाव सेंटरच्या प्रोप्रायटर सौ.शुभांगी मंगेश म्हात्रे यांचा वडापाव नवीन पाताळगंगा एमआयडीसीमध्ये खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. मंगेशदादा वडापाव साठी उत्कृष्ठ दर्जाचे खाद्यतेल, बटाटे, कांदे, मिरची, आले इत्यादी चांगले पदार्थ वापरतो. सर्व पदार्थ चांगले असून देखील चव असेलच असं नाही.
असे म्हंटले जाते की एखाद्याच्या हाताने बनविलेल्या पदार्थांना चवच असते असेच काही मंगेश दादाच्या वडापावच्या बाबतीत आहे. जिभेवर रेंगाळत राहणारी बटाटे वड्याची चव. मिरचीची ओली चटणी, गोड चटणी, लसूनाची सुखी चटणी सोबत तळलेल्या हिरव्या मिरचीचा झणझणीत तडका…ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना..
गरमागरम चवीचा वडापाव खायचा असेल तर अवश्य जरीमरी वडापाव सेंटरला अवश्य भेट द्या. “चवीचे खाणार त्याला मंगेश दादा आवडीने वडापाव देणार”. गिऱ्हाईकाना पिण्यासाठी थंडगार फिल्टर जार मधील पाणी सोबत Free Wi Fi सुविधा. बसण्यासाठी सुसज्ज बाकडे, टेबल, हात धुण्यासाठी वॉश बेसिन अशी उत्तम प्रतीची सेवा, वडापाव विकण्यासोबत गिऱ्हाईकांच्या
आरोग्याचा विचार करणारा दुसरा कुणीही वडापाव विक्रेता असेलच असं मला वाटत नाही आणि वडापावची अगदी रास्त किंमत फक्त 12 रुपये. त्याचसोबत चायनीज भेळ, मंचुरियन( पकोडे ) डिश
तेही फक्त दहा रुपयांत अजून काय हवे. त्यामधील पदार्थ देखील उत्तम दर्जाची चटणी, शेव वापरतो.जास्त नफा मिळो ना मिळो गुणवत्तेत हयगय अजिबात नाही.
सौ. शुभांगी वहिनी आणि मंगेश दादाचा प्रेमळ, मनमिळावू स्वभाव त्यामुळे सर्व गिऱ्हाईकांसोबत कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते बनत चालले आहे. नवीन नवीन पाताळगंगा एमआयडीसीमध्ये जाणारे येणाऱ्या महिला, पुरुष कामगार तसेच मोहोपाडा, दांडफाटा, सावरोली, खोपोली, कर्जत,पेण ये जा करणारे वाहन चालक आणि वैयक्तिक गाडी मधून प्रवास करणारे
प्रवासी देखील गाडी थांबवून मंगेश दादाच्या वडापावची चव चाखल्याशिवाय पुढे जात नाही. इतका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालेला आहे. यामागे मंगेश दादा यांचा गोड स्वभाव आणि प्रामाणिकपणा, मेहनत आहे. मंगेश दादाचा दिलदार स्वभाव त्यामुळे एमआयडीसी मध्ये कामगार ने आण करणारे सर्व वाहनचालक आणि गिऱ्हाईक यांची येथे कायम वर्दळ असते.
मी सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत जेव्हा जेव्हा या मार्गाने जातो तेव्हा येथील वडापाव खाल्ल्याशिवाय आणि सोबत घरी देखील पार्सल वडापाव आवडीने घेवून जातो.
माझ्या मुलीला ओवीला गोड चटणी खूप आवडते ती नेहमी सांगते पप्पा वडापाव सोबत गोड चटणी आणायला विसरू नका. तुम्ही नक्कीच जरीमरी वडापाव सेंटरला अवश्य भेट द्या आणि उत्तमच चवीच्या वडापावचा आस्वाद नक्कीच घ्या. मंगेश दादाचा वडापाव दिवसेंदिवस असाच फेमस होऊन नावलौकिक होवो हीच आई जरीमरी चरणी प्रार्थना.
Discussion about this post