



उंबर्डे गावची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध असलेली आई वज्रादेवीचे मंदिर हे प्राचीन पेशवेकालीन इतिहास आहे. पेशव्यांनी वसई मोहिमेच्या वेळी तिथे देखील वज्रेश्वरी देवीचे मंदिर आहे आपल्या गावी देखील देवीचे असेच मंदिर असावे या भावनेतून वज्रादेवी माऊलीच्या मंदिराची निर्मिती करण्यात आली.
त्याकाळात देवीच्या पूजेसाठी दिवाबत्तीची सोय पेशव्यांनी केल्याचा पेशवे दप्तरी नोंद आहे. आई वज्रादेवी माते की जय! आई माऊलीचा उदो उदो!! अशा गजरात आई वज्रादेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. नऊ दिवस घट बसवून झेंडूच्या फुलांच्या नऊ माळा लावतात. नवव्या दिवशी होम हवन होते.
अशी अख्यायिका आहे की वाशी गावची वरसुआई (जगदंबा)आणि रावे गावाची रायबादेवी, साई गावाची भवानी, आक्कादेवी अशा एकूण सात बहिणीमध्ये वज्रादेवी सर्वात मोठी. हे मंदिर पेशवेकालीन असून पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या समोर हवन कुंड आहे त्याच्या समोर दगडी दीपमाळ आहे.
बाजूला दगडी तुळशी वृंदावन आहे. त्याच्या समोर जमिनीत रोवलेले लाकडी खांब आहेत त्यांचा उपयोग यात्रेत गावच्या आलेल्या मानाच्या काठ्या बांधण्यासाठी होतो. दरवर्षी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. गावकऱ्यांनी 2001 साली मंदिराचा जीर्णोध्दार केला.
प्रशस्त
सभामंडप आणि मुख्य गाभाऱ्यात देवीचे मंदिर आहे. तिथे देवीचा चांदीचा मुखवटा आणि पादुका आहेत. देवीच्या सुंदर मनमोहक आणि विलोभनीय रूपाचे दर्शन होते. मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताना खाली किर्तीमुख आहे वर गणेशमूर्ती आहे. हे जागृत स्वयंभू देवस्थान असून बऱ्याच भक्तांना देवीने दृष्टांत दिलेला आहे. संकटकाळात भक्तांच्या हाकेला धावून जाणारी अशी वज्रादेवी माऊलीची ख्याती आहे.
अनेक भक्त नवस फेडण्यासाठी देवीच्या मंदिरात येते. सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी म्हणजेच आई
वज्रादेवी माऊली..
मुंबई ठाणे पुणे बाहेरगावी कामधंद्यासाठी गेलेले चाकरमानी आवर्जून दर्शन घेण्यासाठी येतात. देवीची ख्याती सर्वदूर पसरली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहकार्याने ते एकवीरा देवी (कार्ला ) अशी पदयात्रा काढण्यात येत आहे त्यामध्ये उंबर्डे, धोंडपाडा,कोप्रोली वाशी परिसरातील भाविक भक्त स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन मोठ्या हर्ष उल्हासात ही पदयात्रा दोन देवीची भेट होते. असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलास राजे निर्मला कमलाकर घरत यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत धर्मपत्नी
सौ.मयुरी कैलास घरत, मुलगी कु.ओवी कैलास घरत, आईसाहेब निर्मला कमलाकर घरत यांनी आई वज्रादेवी माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी आत्या जयश्री उमाकांत भोईर-धोंडपाडा, प्रभावती नरहरी म्हात्रे- भाल, कुंदा काशिनाथ मोकल-मळेघर, मंदा दिनकर म्हात्रे- सापोली, जांभळे परिवार-
आईचे भक्त महेंद्र जांभळे, पांडुरंग जांभळे, जगदीश जांभळे, सदानंद जांभळे, महिला परिवार सीमा भरत जांभळे, आशा राजेंद्र जांभळे, संगीता महेंद्र जांभळे, सुनंदा सदानंद जांभळे, यशवंती यशवंत जांभळे, उषा जगदीश जांभळे, मंगला पांडुरंग जांभळे, साक्षी महेंद्र जांभळे, प्रियांका दिनेश भोईर, स्वरांश दिनेश भोईर,
दिनेश विजय भोईर, तिसरी माळ- म्हात्रे, भोईर, जांभळे कुटुंबीयांनी जागरण, पूजा, अर्चा, पारंपारिक फेर्यांची गाणी, ढोल वाजवून मोठ्या उत्साहात करतात तसेच येणाऱ्या भाविकांची चहा, फराळ याची व्यवस्था करतात. अतिशय हर्ष उल्हासात उंबर्डे ग्रामस्थ हा नवरात्रोत्सव साजरा करतात.
Discussion about this post