• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

६८.८९१ टन कांदा खरेदी करून ६.७२ लाख रुपये थकवल्याचा आरोप

सांगली | प्रतिनिधी : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णुअण्णा फळ मार्केटमधील कांदा-बटाटा विभागातील व्यापाऱ्याची तामिळनाडूतील दोन व्यापाऱ्यांनी १२ लाख ७२ हजार ७५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केल्यानंतर काही रक्कम अदा करून उर्वरित पैसे थकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग

याबाबत शाहूखान बालोचदाद बागवान (वय ३३, रा. पत्रकानगर, कोल्हापूर रोड, सांगली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांची विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये कांदा, बटाटा आणि लसूण विक्रीची कमिशन एजंट म्हणून फर्म आहे.

संशयित महमद अनस ए. (वय ४८, रा. गुडूर बाजार, तामिळनाडू) आणि यासर अरफात (रा. उटी, तामिळनाडू) यांनी तामिळनाडूमधील मेघालयम येथे ‘लाना ट्रेडिंग’ नावाने कांदा-बटाटा विक्रीची मोठी फर्म असल्याचे सांगितले होते. या ओळखीच्या आधारे दोघांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर १५ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत त्यांच्या फर्मकडून एकूण ६८.८९१ टन कांदा खरेदी करून तामिळनाडूला नेण्यात आला. या कांद्याची एकूण किंमत १२ लाख ७२ हजार ७५० रुपये होती. त्यापैकी संशयितांनी फिर्यादीच्या बँक खात्यावर केवळ ६ लाख ७० हजार रुपये जमा केले. उर्वरित ६ लाख ७२ हजार ७५० रुपये देण्यास टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले असून पुढील तपास सुरू आहे. व्यापाऱ्यांशी मोठे आर्थिक व्यवहार करताना योग्य कागदपत्रे, बँक व्यवहार आणि आर्थिक हमी यांची खातरजमा करण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

Ad 1
Tags: Yuvraj Karvekar
Previous Post

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

Related Posts

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या
ताज्या घडामोडी

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

November 21, 2026
7
सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे
ताज्या घडामोडी

सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

November 21, 2026
13
केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग
ताज्या घडामोडी

केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग

November 21, 2026
17
कार्तिकी भागवत एकादशीनिमित्त नागूर येथे भक्तिमय वातावरणात दिंडी
ताज्या घडामोडी

कार्तिकी भागवत एकादशीनिमित्त नागूर येथे भक्तिमय वातावरणात दिंडी

November 21, 2026
12
सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी
ताज्या घडामोडी

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

November 21, 2026
24
दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन
ताज्या घडामोडी

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

November 21, 2026
24

ताज्या बातम्या

सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा

सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा

November 22, 2026
बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

November 21, 2026
सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

November 21, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In