• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

युवा शेतकरी संघर्ष समितीला सोबत घेऊन नागपुरात पत्रकार परिषद; मागणी मान्य न झाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा

नागपूर | प्रतिनिधी : कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे युवा शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. विदेशी कापसाच्या आयातीवरील शुल्क माफ करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत विदेशी कापसावर २० टक्के आयात शुल्क लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

RelatedPosts

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात

सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा

केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्क कमी केल्यामुळे देशांतर्गत कापसाच्या बाजारभावावर परिणाम होत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. याचा थेट आर्थिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. आधीच उत्पादन खर्च, मजुरी आणि इतर वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम देत हिवाळी अधिवेशनापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. अन्यथा आगामी काळात आक्रमक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. हे आंदोलन नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या स्वरूपात असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र आणून व्यापक लढा उभारण्यात येणार आहे. या आंदोलनात युवा पिढीचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला जाणार असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सरकारने दहा दिवसांत निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, अशी भूमिका युवा शेतकरी संघर्ष समितीने मांडली.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी युवा शेतकरी संघर्ष समिती या लढ्यात खांद्याला खांदा लावून उभी राहणार असल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Ad 1
Tags: Kishor Ghyatidak
Previous Post

कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात

Next Post

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

Related Posts

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक
ताज्या घडामोडी

1
सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा
ताज्या घडामोडी

सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा

November 22, 2026
16
बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या
ताज्या घडामोडी

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

November 21, 2026
8
सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे
ताज्या घडामोडी

सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

November 21, 2026
14
केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग
ताज्या घडामोडी

केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग

November 21, 2026
17
Next Post
सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

November 22, 2026
सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

November 22, 2026
कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

November 22, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In