सरपंच जगदीश साळुंके आणि जनसेवक अर्जुन पवार यांच्या पाठपुराव्याला यश
कणकोरी | प्रतिनिधी : कणकोरी गावातील मंदिरापासून स्मशानभूमीपर्यंतच्या मार्गावर आजपर्यंत पथदिव्यांची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
ही समस्या लक्षात घेऊन सरपंच जगदीश साळुंके आणि जनसेवक अर्जुन पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कामासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनंतर काही दिवसांपूर्वी या कामाला मंजुरी मिळाली होती.
आज या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून मार्गावर विद्युत खांब उभारण्यात आले
. यावेळी सरपंच जगदीशभाऊ साळुंके आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
मंदिर ते स्मशानभूमी मार्गावरील प्रकाशव्यवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.











