• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 22, 2026
in Blog
0
केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह; संगीतमय सुंदरकांड पाठाला हजारो भाविकांची उपस्थिती

मेहकर | प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर शहरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात दररोज दुपारच्या सत्रात भव्य रामकथा यज्ञ, तर सायंकाळच्या सत्रात विविध कीर्तनांसह भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सेवा सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी विदर्भ कन्या प. पू. मीरा अलकाश्रीजी यांच्या सुमधुर वाणीतून भव्य संगीतमय रामचरितमानस सुंदरकांड पाठाचा सामूहिक कार्यक्रम पार पडला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक

औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

यावेळी मार्गदर्शन करताना प. पू. मीरा अलकाश्रीजी यांनी सांगितले की, मनुष्याने वैयक्तिकरीत्या केलेल्या सुंदरकांड पाठाचे महत्त्व आहेच; मात्र सामूहिक सुंदरकांड पाठ केल्याने शंभर यज्ञांचे फळ प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच माणसाने आयुष्यात केलेले दान आणि केलेली भक्ती यांचा गाजावाजा करू नये. दान आणि भक्ती ही नेहमी निःस्वार्थ भावनेने व गुप्तपणे करावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

भगवान श्रीराम आणि हनुमान यांच्या जीवनातील आदर्श प्रत्येकाने आपल्या आचरणात आणावेत, असे आवाहन त्यांनी केले. माता सीतेच्या जीवनावरही त्यांनी प्रकाश टाकला. संत-महंत समाजाला नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण देतात. त्यामुळे प्रत्येकाने रामकथा, भागवत, रामायण आणि महाभारत यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे श्रवण करावे. त्यातील विचार दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी सांगितले.

संगीतमय सुंदरकांड पाठ आणि हनुमानाच्या पराक्रमाचे वर्णन करताना त्यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी मेहकर शहरातील एमईएस हायस्कूलच्या प्रांगणातही भव्य सुंदरकांड पाठाचे आयोजन झाल्याची आठवण सांगितली.

या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थित राहून सुंदरकांड पाठाचा आनंद घेतला. ‘जय हनुमान’ आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. हा अद्भुत सोहळा अनुभवताना भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते.

‘ऐहलोकीचा देव या जगतात कुठेही नाही,’ या भावनेतून भक्तांनी या भक्तिमय सोहळ्याचा अनुभव घेतला.

Ad 1
Previous Post

आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

Related Posts

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण
Blog

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

November 22, 2026
7
कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक
Blog

कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक

November 22, 2026
12
औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
Blog

औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

November 21, 2026
18
मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी
Blog

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

November 21, 2026
7
दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी
Blog

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026
12
शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड
Blog

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

November 19, 2026
11

ताज्या बातम्या

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

November 22, 2026
आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

November 22, 2026
शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

November 22, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In