• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाची मध्यस्थी; २६ नोव्हेंबरच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे कारखानदारांना आदेश

कोळपेवाडी | प्रतिनिधी :

अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस दराच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश आणि ऊस दरावरून निर्माण झालेला संघर्ष पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी उद्यापासून गाळप बंद ठेवून २६ नोव्हेंबर रोजी आयोजित बैठकीला उपस्थित राहावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

RelatedPosts

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

सापडलेली सोन्याची पोत राजेंद्र बनकर यांनी केली मूळ मालकाला परत

या निर्णयामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ऊस दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन तीव्र करण्यात येत असताना प्रशासनाने कारखानदारांना चर्चेसाठी पाचारण केले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाला प्रतिटन चार हजार रुपये भाव मिळावा, अशी मागणी केली आहे. मात्र, काही साखर कारखान्यांनी तीन हजार १०० रुपये, तर काही कारखान्यांनी तीन हजार २०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना मान्य नसल्याने त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरमध्ये ऊस दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. आंदोलनकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, साखर आयुक्त गणेश पुरी आणि खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

या बैठकीत उसाचे दर जाहीर होईपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे २६ नोव्हेंबरच्या बैठकीत ऊस दराच्या प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Nivratti Pagar
Previous Post

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

Related Posts

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

November 23, 2026
2
पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

November 23, 2026
2
सापडलेली सोन्याची पोत राजेंद्र बनकर यांनी केली मूळ मालकाला परत
ताज्या घडामोडी

सापडलेली सोन्याची पोत राजेंद्र बनकर यांनी केली मूळ मालकाला परत

November 23, 2026
4
तीन वर्षांपासून रखडलेल्या पिंपळगाव कमळेश्वर आरोग्य उपकेंद्राच्या कामाला अखेर सुरुवात
ताज्या घडामोडी

तीन वर्षांपासून रखडलेल्या पिंपळगाव कमळेश्वर आरोग्य उपकेंद्राच्या कामाला अखेर सुरुवात

November 23, 2026
2
घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही
ताज्या घडामोडी

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

November 23, 2026
21
मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन
ताज्या घडामोडी

मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन

November 23, 2026
57
Next Post
पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

ताज्या बातम्या

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

November 23, 2026
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

November 23, 2026
पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

November 23, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In