घोडेगावच्या उपसरपंचांसह पाच जणांचा शिवसेनेत प्रवेश; डॉ. मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा
वर्धा | प्रतिनिधी :
वर्धा येथे २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवसेनेच्या सचिव तथा आमदार आणि पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख डॉ. मनीषा ताई कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवळी तालुक्यातील घोडेगाव येथील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी घोडेगावचे उपसरपंच सुनील उपासे यांच्यासह प्रवेश भेंडे, दिनेश गायधने, संतोष खडसे आणि संदीप देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेचे वर्धा जिल्हाप्रमुख प्रशांत (बाळा) शहागडकर, जिल्हाप्रमुख राजेश सराफ, डॉ. निलेश गुल्हाने, शिवसेना लोकसभा वर्धा संघटक रविकांत बालपांडे, वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत मिरापूरकर, वर्धा लोकसभा सहसंघटक गणेश इखार, उपजिल्हाप्रमुख संजय गिरी आणि महिला आघाडीच्या वर्धा जिल्हाप्रमुख शुभांगी ठामेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
पक्षात प्रवेश केलेल्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रशांत (बाळा) शहागडकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











