• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

कु. काजल जगताप हिच्या यशाने विडनीसह फलटण तालुक्याचा गौरव; संघर्षमय प्रवासातून तरुणीने गाठले यशाचे शिखर

फलटण | प्रतिनिधी :

विडनी गावची कन्या कु. काजल मनिषा अर्जुन जगताप हिची मंत्रालयात महसूल अधिकारी म्हणून निवड झाली असून, तिच्या या यशामुळे विडनी गावासह फलटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

RelatedPosts

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

मजुरी करून हलाखीच्या परिस्थितीत आपल्या लेकीला शिक्षण देणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचे आज चीज झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरीब कुटुंबातून मंत्रालयापर्यंत मजल मारणाऱ्या काजलने आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे. तिचा हा प्रवास अनेक गरीब व होतकरू मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

काजलच्या या यशाबद्दल २३ नोव्हेंबर रोजी रात्री विडनी येथील तिच्या राहत्या घरी जाऊन तिचा व तिच्या आई-वडिलांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्यिक तानाजी जगताप आणि मार्गदर्शक अविनाश जगताप सर यांच्या उपस्थितीत काजलला भारतीय संविधानाची उद्देशिका, पुष्पहार, पुष्पगुच्छ आणि पेन भेट देऊन गौरविण्यात आले.

मजुरी करून आपल्या मुलीला अधिकारी बनविणाऱ्या काजलच्या आई-वडिलांचाही ‘खरे हिरो’ म्हणून सन्मान करण्यात आला. या वेळी बहुजन समाज पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रदीप उर्फ प्रेम मोरे, युवा उद्योजक अजय सुळ, नवनाथ लकडे पाटील, राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषदेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषद टीम तसेच महाराजा यशवंतराव होळकर जयंती महोत्सव समिती २०२६ टीमचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सत्कार सोहळ्यास उपस्थित होते.

काजलच्या निवडीबद्दल विडनी गावासह संपूर्ण फलटण तालुक्यातून तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Ad 1
Tags: Nitin Sul
Previous Post

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

Related Posts

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड
ताज्या घडामोडी

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

November 24, 2026
5
देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
ताज्या घडामोडी

देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

November 24, 2026
2
पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

November 23, 2026
8
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

November 23, 2026
7
पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

November 23, 2026
6
सापडलेली सोन्याची पोत राजेंद्र बनकर यांनी केली मूळ मालकाला परत
ताज्या घडामोडी

सापडलेली सोन्याची पोत राजेंद्र बनकर यांनी केली मूळ मालकाला परत

November 23, 2026
8

ताज्या बातम्या

विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड

विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड

November 24, 2026
संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

November 24, 2026
देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In