• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पीक विविधीकरणातून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
पीक विविधीकरणातून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन; फलटण तालुक्यातील ६९ कृषी अधिकाऱ्यांचा सहभाग

फलटण | प्रतिनिधी :

पीक विविधीकरणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासह आधुनिक आणि एकात्मिक शेती पद्धतींचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित पीक विविधीकरण प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत कृषी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणात फलटण तालुक्यातील ६९ कृषी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

RelatedPosts

विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि भारतीय कृषी संशोधन परिषद – भारतीय शेती प्रणाली संस्था, मोदिपुरम यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत २३ नोव्हेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांसाठी सातव्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उल्हास सुर्वे यांनी केले. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात प्रतिएकरी १०० टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीद्वारे जमीन आरोग्य व्यवस्थापन, सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान, उसातील आंतरपीक व्यवस्थापन, दुष्काळी परिस्थितीत चारा पिकांचे व्यवस्थापन आणि फळबाग लागवड तंत्रज्ञान या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच ऊस संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्राला भेट देऊन विविध तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.

या प्रशिक्षणात डॉ. आर. एल. भिलारे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. डी. एस. थोरवे, डॉ. किरण ओंबासे, डॉ. डी. डी. सावळे, डॉ. के. बी. शिंदे आणि डॉ. राहुल कडू यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कृषी अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रशिक्षणातून मिळालेली आधुनिक तंत्रज्ञानाची आणि संशोधनाधारित माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. पीक विविधीकरणाच्या माध्यमातून शेती अधिक शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.

चौकट : संशोधनाधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार

शेतीसमोरील बदलती आव्हाने, पाण्याची उपलब्धता आणि उत्पादन खर्च विचारात घेता पीक विविधीकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशिक्षित कृषी अधिकारी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.

Ad 1
Previous Post

विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड

Related Posts

विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड
ताज्या घडामोडी

विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड

November 24, 2026
3
संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड
ताज्या घडामोडी

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

November 24, 2026
6
देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
ताज्या घडामोडी

देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

November 24, 2026
2
पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

November 23, 2026
9
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

November 23, 2026
7
पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

November 23, 2026
6

ताज्या बातम्या

पीक विविधीकरणातून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

पीक विविधीकरणातून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

November 24, 2026
विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड

विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड

November 24, 2026
संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In