• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कपिलधार यात्रेला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीतील महिलेला ट्रकची धडक; संतप्त वारकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
कपिलधार यात्रेला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीतील महिलेला ट्रकची धडक; संतप्त वारकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

केज | प्रतिनिधी :

श्री क्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीतील एका महिलेला ट्रकची धडक लागून ती जखमी झाली. या घटनेनंतर ट्रक चालक आणि दिंडीतील वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. संबंधित ट्रक चालकावर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त वारकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

RelatedPosts

मुक्ताईनगर शहरात ‘नो एन्ट्री’चा बोजवारा; अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

पीक विविधीकरणातून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड

कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र कपिलधार येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पायी दिंडीने जात आहेत. दरम्यान, या दिंडीतील एका महिलेला ट्रकची धडक लागल्याने ती जखमी झाली. या घटनेमुळे वारकरी संतप्त झाले. ट्रक चालकावर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी करीत त्यांनी स्थानिक पोलीस घटनास्थळी येईपर्यंत रास्ता रोको सुरू ठेवला.

या आंदोलनामुळे अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडीमुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ स्वतः आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली. संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वारकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. त्यानंतर भाविकांची दिंडी पुन्हा श्री क्षेत्र कपिलधारच्या दिशेने रवाना झाली.

दरम्यान, या घटनेबाबत केज पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे यांनी दिली.

या घटनेमुळे यात्रेच्या पार्श्वभूमीवर पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Ad 1
Tags: Kamlakar Sonawane
Previous Post

पीक विविधीकरणातून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

Next Post

मुक्ताईनगर शहरात ‘नो एन्ट्री’चा बोजवारा; अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

Related Posts

ताज्या घडामोडी

1
विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड
ताज्या घडामोडी

विडनी गावची कन्या मंत्रालयात! मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकीची महसूल अधिकारीपदी निवड

November 24, 2026
14
संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड
ताज्या घडामोडी

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

November 24, 2026
10
देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
ताज्या घडामोडी

देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

November 24, 2026
10
पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

November 23, 2026
9
Next Post

मुक्ताईनगर शहरात ‘नो एन्ट्री’चा बोजवारा; अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

मुक्ताईनगर शहरात ‘नो एन्ट्री’चा बोजवारा; अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

November 24, 2026
कपिलधार यात्रेला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीतील महिलेला ट्रकची धडक; संतप्त वारकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको

कपिलधार यात्रेला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीतील महिलेला ट्रकची धडक; संतप्त वारकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको

November 24, 2026
पीक विविधीकरणातून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

पीक विविधीकरणातून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In