सोयगाव : धार्मिक तेढ निर्माण करणारे इंस्टाग्रामवर स्टेटस ; सोयगाव शहरात तणावसोयगावशहरात धार्मिक तेढ निर्माण करणारे रिल्स इंस्टाग्राम वर ठेवल्याने शहरात तणाव निर्माण झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. दरम्यान पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढविल्यामुळे रात्री उशीरा परिस्थिती नियंत्रणात होती.
मात्र तणाव निवळला नव्हता. शहरारातील एका मुस्लिम तरुणाने इंस्टाग्रामवर धार्मिक तेढ निर्माण करणारी रिल्स शेअर केली. ही रिल्स काहींच्या लक्षात आल्यावर सोशल मीडियावर व्हायरल झाली.
त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या मुळे शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान काही नागरिकांचा जमाव सोयगाव पोलीस ठाण्याचे समोर जमा झाला होता.
पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक रजाक शेख जमादार राजू बर्डे दिलीप पवार आदींसह पोलिसांनी रात्री शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला.इंस्टाग्रामवर धार्मिक भावना दुखावल्याची रिल्स स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी आरोपी शेख जहीर शेख सुलतान याचे विरुद्ध सुनील गावंडे यांनी रात्री अकरा वाजत दिलेल्या फिर्यादी वरून बारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
रात्री उशिरा अतिरिक्त पोलीस कुवक मागविण्यात आली दरम्यान पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी शहरवासीयांना शांततेचे आवाहन केले होते.
Discussion about this post