



जिल्हा परिषद ठाणे चे माजी उपाध्यक्ष श्री सुभाष गोटीराम पवार यांनी जनसेवा प्रतिष्ठान आयोजित नारीशक्ती कार्यक्रमातून नारीशक्तीचे शक्ती प्रदर्शन जोरदार घडवून आणले असून,आपल्या मतदार संघातील नामवंत महिला यांचा सन्मान केला आहे असे बोलले
जाते की, मुरबाड विधानसभेसाठी श्री सुभाष पवार इच्छुक असल्याची जोरदार चर्चा असून त्या अनुषंगाने शक्ती प्रदर्शन चालू आहे सुभाष पवार यांनी सामाजिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाव केलेले आहे. त्यांची जनसेवा शैक्षणिक संस्था हे अनेक वर्षांपासून मुरबाड तालुक्यामध्ये अनेक विद्यार्थी घडवत आहे तसेच सुभाष पवार हे माजी आमदार श्री गोटीराम भाऊ पवार यांचे पुत्र असल्याकारणाने पवार यांनी केलेले समाजकार्य आता श्री सुभाष पवार यांना उपयोगी पडणार का ?
तसेच आज सुभाष पवार यांनी नारी शक्ती हा कार्यक्रम त्यांचं संस्थेचा शिवले कॉलेज मध्ये घेतला असता तेथे अनेक हजारोंचा संख्येने महिला हजर राहून सुभाष पवार यांना निवडणुकी साठी आशिर्वाद दिले तसेच या कार्यक्रम प्रसंगी माजी केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री श्री कपिल पाटील साहेब यांची उपस्थिती ही लक्षवेधी ठरली असून श्री सुभाष पवार यांचा प्रत्येक कार्यक्रमांमध्ये माजी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री श्री कपिल पाटील
साहेब हे आवर्जून उपस्थित असतात श्री कपिल पाटील साहेब आणि श्री सुभाष पवार यांचे अनेक वर्षा पासून घनिष्ठ संबंध आहेत आता सर्व मतदार यांचे याकडे लक्ष लागले आहे की श्री कपिल पाटील साहेब हे सुभाष पवार यांना आमदारकीसाठी मदत करणार का ?
Discussion about this post