सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक बिपीनदादा कोल्हे यांची देशपातळीवर कार्य करणाऱ्या दि. इथेनॉल व बायोफ्युएल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी नुकतीच निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रगत विचारांचा वारसा पुढे चालु ठेवत युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अल्पावधीत साखर कारखानदारीतील प्रगत आधुनिकीकरणाचा अवलंब करत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने देशपातळीवर सर्वप्रथम उसाच्या रसापासुन इथेनॉलची निर्मीती तसेच महिंद्रा ॲप द्वारे ऊस पिक लागवड, नियोजन व हार्वेस्टिंग संदर्भात ए.आय चा (आर्टिफिशियल इंटेलिजीयन्स) वापर करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सहकार क्षेत्रातील राज्य व देशपातळीवरील अनेक नामवंत सहकारी संस्थेवर विवेकभैय्या कोल्हे यांची संचालक म्हणून निवड झालेली आहे त्यात हा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्यात दि इथेनॉल व बायोफ्युएल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने विविध ठिकाणी इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र व राज्य शासनांच्या मदतीने आपले योगदान दिले आहे.
प्रामुख्याने राष्ट्रीय इथेनॉल मिश्रण कार्यक्रमास पाठींबा देण्यासाठी आपल्या देशातील साखर उद्योग हा सर्वात मोठा कृषी आधारीत उद्योग आहे, तो ग्रामिण भागातील आर्थीक सामाजिक विकासासाठी तसेच इथेनॉल मिश्रणाच्या इंधन प्रगती संदर्भात परकीय चलनाची बचत करण्यासाठी राष्ट्राला पाठींबा देण्यासाठी काम करत आहे.
दि इथेनॉल व बायोफ्युएल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे एकुण १४२ सभासद असुन त्यातील ११३ हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील तर २९ सभासद हे बाहेरच्या राज्यातील आहेत. त्यांची वार्षीक उत्पादन क्षमता २६६ कोटी लिटर्स आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल राज्यातील सर्वस्तरावरून विवेक भैय्या कोल्हे यांचे अभिनंदन होत आहे., तसेच कार्यक्षेत्रातील सर्व उस उत्पादक सभासद, शेतकरी, मा. संचालक मंडळ, अधिकारी, कामगार व राज्यातील तरूण युवा वर्ग यांच्याकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Discussion about this post