
प्रतिनिधी :सुधीर घाटाळ
डहाणू,०८ ऑक्टो.रोजी बहुजन विकास आघाडी कार्यालय येथे सभा घेण्यात आली. विधानसभा २०२४ बहुजन विकास आघाडीचा बिगुल वाजला पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाने पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार बळीरामजी जाधव, ज्येष्ठ नेते शशांक पाटिल प्रभारी डहाणू तलासरी, ज्येष्ठ नेते विलसण फरगोस, युवा उपाध्यक्ष सारस जाधव, पालघर विधानसभा प्रमुख अध्यक्ष सुरेश पाडवी,आदिवासी सेल आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. अभिजित देसक, डहाणू तालुका अध्यक्ष अरुण निकोले, युवा नेते आनंद ठाकूर, विवळवेढे सरपंच नितेश भोईर, निकणे उपसरपंच सुदाम मेरे, कापशी उपसरपंच लक्ष्मीकांत जाधव, माजी सायवन सरपंच जगदीश सापटा, हेमंत पटेल, राजेश माच्छी, प्रविण वरठा , रवि वरठा आदी.उपस्थित होते.

डहाणू विधानसभेवर बहुजन विकास आघाडी मधून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी पक्षाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने सर्व पद्धतीची चर्चा करण्यात आली. व डहाणू विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून अंदाजित ६ उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या सदर उमेदवाराचे नाव हे पक्षश्रेष्ठीन कडे नेऊन चर्चा करण्यात येईल असे संबद्धित आलेल्या पदाधिकऱ्याने सभेत सांगितले.

खास करून पालघर विधानसभा प्रमुख अध्यक्ष सुरेश पाडवी,डहाणू तालुका अध्यक्ष अरुण निकोले, यांच्या नावाची कार्यकर्त्यान कडून जोरदार चर्चा करण्यात आली.

Discussion about this post