71 Total Views , 1 views today
विद्या मंदिर कोदे खुर्द शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन…मोफत आरोग्य तपासणी….
दि. ०८ ऑक्टोंबर…
गगनबावडा प्रतिनिधी:-
आरोग्य तपासणी
मनोरंजनासोबत लोकांचे आरोग्य ही महत्त्वाचे असते,या अनुषंगाने शाळेच्या आवारात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.
विविध स्पर्धा
घरगुती कामातून थोडा वेळ काढून स्वत:साठी जगावे असे प्रत्येक महिलेला वाटतं.
म्हणून विद्या मंदिर कोदे खुर्द या शाळेने नवरात्र उत्सवचे अवचित साधून महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धा
संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात,चमचा लिंबु,बादलीत चेंडु टाकणे अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन महिलांनी खेळांचा आनंद लुटला.
यावेळी कोदे खोरीचे आधारस्तंभ मा.विलास पाटील साहेब, ग्रामपंचायत कोदे लोकनियुक्त सरपंच सौ.शोभा विलास पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रघुनाथ बळवंत पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, मुख्याध्यापिका सिमा मराडे , शिक्षिका सारिका हेमाडे, अंगणवाडी सेविका पडवळ मॅडम, कर्मचारी आणि गावातील महिला उपस्थित होत्या.

Discussion about this post