25 Total Views , 1 views today
हरयाणाच्या विजयामुळे महाराष्ट्रातील महायुती चा विजयी आत्मविश्वास नक्कीच वाढणार….- सौ. कल्पना तारमळे
शहापूर :- प्रफुल्ल शेवाळे
हरयाणाच्या विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपचे आणि पर्ययाने महायुतीचे बळ वाढले असून पुढील महिन्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येईल, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा सौ. कल्पना तारमळे यांनी व्यक्त केला आहे.. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी सुद्धा अशा प्रकारे विधाने केल्याचे दिसून येते आहे.. राज्यातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती निश्चित पणाने महाराष्ट्र विधानसभा गाजवल्या शिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास सौ. तारमळे यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसल्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शैथिल्य व उदासीनता आली होती. हरयाणातील विजयामुळे मात्र त्यांच्यात चैतन्य आले असून विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे.
राज्यातील विविध ग्रामीणभागामध्ये महायुतीचाच वरचष्मा कायम राहिल आणि पुन्हा एकदा सत्तेची समीकरणे महायुती च्या पदरात पडतील अशी परिस्थिती कालच्या हरियाणा च्या विजयाने महाराष्ट्र मध्ये सुद्धा पाहायला मिळेल.यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सह शिवसेना आणि भाजपच्या तळागाळातील माहिला पदाधिकारी आणि कार्यकर्त निश्चित पणाने यासाठी जीवाचं रान करतील अशी प्रतिक्रिया कल्पना तारमळे यांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post