
… परवा परवा वाचण्यातून एक पुस्तक गेले पुस्तकावरचे कवर पाहिले आणि मनात एकदम शंका येऊन गेली. हे पुस्तक अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असे आहे असे माझ्या मनाला वाटत होते. नक्की या पुस्तकात काय आहे म्हणून परवा वाचवण्या स घेतले ग्रामीण कथा लेखक नाट्य लेखक उत्कृष्ट कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारे.
अशोक भीमराव रास्ते यांनी लिहिलेले हे अतिशय उत्कृष्ट पुस्तक या ग्रामीण कथासंग्रह मध्ये पहिलीच कथा,,चवंडक,, वाचावयास सुरुवात केली खरंतर ही कथा समाजातील जुन्यातील रूढी परंपरा याचे दर्शन घडवून देते. श्रद्धेतून अंधश्रद्धेच्या पाठशाला उघडल्या जातात असे प्राचार्य शिवाजीराव भोसले लिहितात. परंतु पारंपारिक रुढीला छेद देण्याचे काम लेखकाने उत्कृष्ट केले आहे ही कथा निर्मला या मुलीवर आधारलेली आहे.
आई जोगतीन असते आणि तिला एकच मुलगी असते परंतु आई वयस्कर झाल्यानंतर यल्लमा देवीचा जग त्या मुलीच्या स्वाधीन करते. आई वारल्यानंतर या मुलीच्या वाट्याला आलेली दुख लेखकाने हृदयस्पर्शी असे लिहिले आहे. समाजामध्ये अजून जुन्या चाली रुडी पाहावयास मिळतात त्यांचे जीवन अतिशय खडतर असे असते. या पोटासाठी बाहेर जोगवा मागायला गेल्यानंतर समाज
अतिशय वेगळ्या दृष्टीने पाहतो तरीपण. पूर्वीपासून त्या मुलीच्या घरात यल्लमा देवीचा जग असल्यामुळे तिच्या जीवनामध्ये झालेली फरपट अतिशय हृदयस्पर्शी अशी आहे. अजून सुद्धा कर्नाटक भागातील काही महिला स्वतःच्या शरीराचा सौदा करण्यासाठी. बाहेर रोडवर दिसून येतात या मुलीच्या वाटेला सुद्धा हेच दुःख आले होते. परंतु या मुलीने तिथून पळ काढून एक वेगळा मार्ग पत्करला यात आपण कसे अडकले तेही या मुलीने
सांगितले आहे. या मुलीने वेश्या गल्लीतून बाहेर पडून सामाजिक परिवर्तनाची बदलाची दिशा घेऊनच तिने प्रत्येकाच्या घरी जाऊन. स्त्रीच्या शिक्षणाचे महत्व सर्वांना पटवून दिले तिने सर्वांना पटवून देताना थोरामोठ्यांची दाखले दिले. आणि शेकडो मुलींना तिचे विचार पटले व त्यातूनच निर्मला ने एक सामाजिक संस्था काढली. व त्या संस्थेमध्ये शिक्षण व्यवसाय विनामूल्यशिक्षण देश प्रेम इत्यादी शिकवून यामुळे अशा शिक्षणामुळे बऱ्याच स्त्रिया. कुणी इंजिनियर झाल्या तर काही सैनिक झाल्या काही पोलीस झाल्या तर काही स्त्रियांनी स्वतंत्रपणे
व्यवसाय सुरू केला या स्त्रिया आनंदाने जीवन जगू लागल्या. चांगल्या मार्गाने मिळालेल्या अन्नाची चव वेगळीच असते निर्मला ने जुन्या रुढी ना तिलांजली देऊन एका नवीन पर्वाची सुरुवात केली तिला अंधारातून प्रकाशाचा मार्ग सापडला. तिच्यासारख्या रूढी परंपरेत अडकलेल्या निराधार अनाथ मुलीचा निर्मला आधार बनला. सुखदुःख कशात आहे याचा मर्म निर्मलाला कळल्यामुळे रुढीत अडकणाऱ्या मुलींना त्यातून बाहेर काढले. अशी ही हृदयस्पर्शी कथा पुन्हा वाचावी वाटते…..।
…. या कथासंग्रहातील दुसरी कथा वाचल्याचा झरा ही सुद्धा ह्रदयस्पर्शी अशी कथा आहे या कथेमध्ये आई-वडिलांच्या नंतर भरत वर आलेली बिकट दिवस अतिशय खोल पणे लेखकाने लिहिले आहे. जीवनाचा अर्थ कधी कधी कळत नाही माणूस एवढा का धडपडतो. याचे उत्तर मिळत नाही सुखदुःखाच्या घटनाचा अर्थ लावता येत नाही. नक्की आपला जन्म कशासाठी आहे याचा सुंदर वर्णन या कथेत वाचवण्यास मिळाले. जन्मदाता ही कथा सुद्धा अतिशय सुंदर अशी आहे बी पॉझिटिव ही कथा सुद्धा अतिशय सुंदर आहे. या कथासंग्रामध्ये एकूण सात कथा आहेत या पुस्तकामध्ये ग्रामीण कथा लेखक
अशोक रास्ते यांनी ग्रामीण भागातील वर्णन अतिशय सुंदर केली आहे. ग्रामीण भाषेमध्ये त्यांची रंगणारी लेखणी प्रत्यक्ष या पुस्तकामध्ये अनुभव घेऊन आली आहे. यापूर्वी रास्ते सर यांनी लिहिलेला,, ब्रह्म घोटाळा,, या पुस्तकाचे परीक्षण सुद्धा काही वर्षांपूर्वी गेले होते सरांचे नाव महाराष्ट्रभर आहे त्यांचे शिक्षण डीएड एम ए बी एड पर्यंत झाले असून. त्यांनी कृष्ण नीती , पैसा रे पैसा, या टोपली खाली दडलय काय, राजकारण या
चित्रपटांमध्ये सुंदर भूमिका सादर केल्या आहेत. त्यांची प्रकाशित नाटके, न्याय आहे देवाघरी, पुढारी दोन, खुनी कोण, सौभाग्य नाही नशिबी माझ्या, आणि शपथ तुला मंगळसूत्राची. त्याचप्रमाणे सांगली आकाशवाणी वरून कथाकथन प्रसारित दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून,, माझी माय,, मध्ये मुलाखत सुद्धा दाखवण्यात आली होती…।
…. फाटक आभाळ, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग विभागीय राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाने आले होते. त्यांचं व्यवसायिक एक नाटक आहे,, दिसतं तसं नसतं,, त्यांनी काही कथासंग्रह कादंबरी सुद्धा लिहिली आहे. अर्धांगी कादंबरी, फसलेल्या वाटा, ब्रह्म घोटाळा,चवंडकं, शाळा लावते लळा, एकांकिका पोराची धमाल साधूची कमाल बालकथा संग्रह. त्याचप्रमाणे अध्यात्मिक विषयांमध्ये,, स्वामी कचरनाथ गुरुभक्ती ज्ञानामृत संदर्भ ग्रंथ.
त्याचप्रमाणे या लेखकाने लघु चित्रपट निर्मिती लेखन सुद्धा केले आहे. वादळवाट, चला जाऊया शाळेला, पर्यावरण एक नवजीवन, कचरनाथ माझी माऊली, अशोक रास्ते या ना 2010 साली जिल्हा परिषद सांगली तर्फे देण्यात येणारा.,, जिल्हा आदर्श पुरस्कार,, देऊन सन्मानित करण्यात आले होते. सध्या ते अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, कविता सागर साहित्य अकादमी कोल्हापूर, संवाद ग्रामीण साहित्य संमेलन 2015,
शिरढोण. अंकुर साहित्य संघ अकोला शिरढोण, सैनिक टाकळी साहित्य परिषद, सैनिक टाकळी हातकणंगले साहित्य परिषद. सदस्य म्हणून सध्या काम करीत आहेत ,,चवंडकं,, या ग्रामीण कथासंग्रहाची ही दुसरी आवृत्ती अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर यांनी प्रकाशित केली आहे. कोल्हापूर मध्ये अभिनंदन प्रकाशन अतिशय उत्कृष्ट पुस्तके छापून एक सुंदर काम करत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. इथून पुढच्या काळामध्ये या लेखकांने उत्कृष्ट साहित्याची सेवा करावी ही अशा मनात धरून व त्यांना पुढील साहित्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो…।
दत्तात्रय पांडुरंग मानगुडे,
……………………………………………………….।
चवंडकं, ग्रामीण कथासंग्रह.
लेखक, अशोक भीमराव रास्ते.
प्रकाशक, अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर.
एकूण पृष्ठे, 119
किंमत, 240 रुपये.
अतिशय वाचणीय असा हा सुंदर कथासंग्रह संग्रही ठेवावा असा..।
Discussion about this post