गवळेवाडी गावापासून अर्धा किलोमिटर अंतरावर बसस्टॉप असून गवळेवाडीतील ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांना याच बस स्टॉप वरून तुळजापूर वडाळा सावरगाव ला ये जा करावी लागते .
येथील विद्यार्थी वडाळा येथे शिक्षणासाठी ये जा करतात . परंतू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शेड नव्हता . शेड अभावी प्रवासी व शाळकरी मुले तासंन् तास बसची वाट बघत उभी असत .
गवळेवाडी येथील ग्रामस्थांच्या मागणी नुसार आणि ग्रामपंचायत सदस्य श्री दत्ता रामचंद मोरे यांच्या सततच्या पाठपूराव्यामुळे तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी तात्काळ आपल्या आमदार निधीतून ७ लाख निधी उपलब्ध करून दिला आहे . हे काम लवकरच पूर्ण होऊन नागरीकांना योग्य सुविधा उपलब्ध होईल .
Discussion about this post