
नायगाव तालुका प्रतिनिधी…
जय तुळजा भवानी दुर्गा मंडळाच्या वतीने आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमात कु संस्कृती बाळासाहेब भेदेकर हिने व प्रसिद्ध गायक श्यामसुंदर गायकवाड यांनी भक्ती गिते गात आपल्या मधुर वाणीने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
सध्या सर्वत्र नवरात्र महोत्सवाची धुम सुरू असून अनेक मंडळाच्या वतीने धार्मिक व सामाजिक उपक्रमांची रेलचेल सुरू आहे.त्यातच नरसी येथील प्रसिद्ध गायक श्यामसुंदर गायकवाड यांच्या बहारदार गितांच्या कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.पत्रकारिता करत असतांना आपल्या आवडीचे क्षेत्र असलेल्या गायनाकडे वळून एक छंद जोपासत नायगाव तालुक्यात एक चांगला गायक म्हणून ते सर्व परिचित झाले आहेत. नरसी येथील जय तुळजा भवानी दुर्गा मंडळाच्या वतीने
आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कु.संस्कृती बाळासाहेब भेदेकर हिने मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात,बाजाराला विकण्या निघाली गवळण,नको मारू रे कान्हा पिचकारी ,आरे द्वार पालो अदि भक्ती गीते गायली.आणि उपस्थितांचे मने जिंकली.यावेळी पत्रकार श्यामसुंदर गायकवाड यांनी जय गणेश जय गणेश देवा,पंकिडा ओ पंकिडा,विठू माऊली तू माऊली जगाची,माझे माहेर पंढरी अदी गिते सादर करून
उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडाटासह चांगला प्रतिसाद मिळवल्या. यावेळी दोन्ही गायकांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी टायगर शिंदे (कॉमेडी किंग), रजनीकांत शिंदे, सतीश डोंगरे. अध्यक्ष कृष्णा राठोड,उपाध्यक्ष बालाजी मिरेवाड ,कोषाध्यक्ष राजेश हांडेवार,सचिव सुरज भंडारे ,मंडळ अध्यक्ष
चंद्रकांत कुंडकर सदस्य अक्षय राठोड़ अमोल राठोड़ अर्जुन राठोड ,देवीदास राठोड ,चंद्रकांत राठोड मारोती राठोर अनिल बटेवाड ,दत्ता वडजे ,साईनाथ चौहान ,ओमकार चौहान ,बालाजी मनेमोड, शिवशंकर बागड़े, माधव बागड़े, संदीप जाधव सह रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती…..
Discussion about this post