मेटीखेडा -कळब तालुका अंतर्गत येतअसलेल्या मेटीखेडा मंडळ तील शेतकरी आज अप्पर तहसील मेटीखेडा येथे तहसीलदार मा. धीरज स्थूल साहेब यांना निवेदन दिले सविस्तर वृत्त असे कि सन 2023-2024चे कापूस, सोयाबीन पिकपेरा न चढल्यामुळे तसेच पीक पेरा असून सुद्धा यादीत नाव न आल्यामुळे कापूस, सोयाबीन अनुदान पासून मुकले आहे त्याना सरसकट सातबारा क्षेत्रा नुसार लाभ देण्यात यावे मागील वर्षां अतिवृष्टी चा अनुदान लाभार्थी थंब लावून KYC करून सुद्धा रक्कम जमा झाली नाही व पीक विमा कंपनी चा पंचनामा हा मनमानी कार्यक्रम चालू असून यांची आढावा बैठक घेऊन शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांना देण्यात यावी ह्या मागणी करिता निवेदन देण्यात आले त्यावेळी हसमुख राठोड सरपंच पहूर (ई )मोरेश्वर कुळसंगे सरपंच मेटीखेडा वीरेंद्र चव्हाण प्रहार जनसक्ती पक्ष यवतमाळ सुनील आडे ग्रामपंचायत सदस्या मेटीखेडा रमेश डबले, मनोज राठोड, सुधाकर ठाकरे, भगवान ठाकरे,लालशिंग चव्हाण, मारोती लडके, रवींद्र चिंचाळकर, जीवन, बेंदुरे, श्रीराम आडे, राहुल मडावी आदी शेतकऱ्यांना उपस्थितीत होते.
Discussion about this post