दर्गा मशीद कमिटी तर्फे “नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड” विजेते बादशाह शेख यांचा विशेष सन्मान…
नॅशनल अचिव्हर्स रेकग्निशन फोरम टीम जेनिथ इंटरनॅशनल इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन नवी दिल्ली,द्वारे आयोजित नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2024 समाज सेवा या क्षेत्रामध्ये विशेष कार्य केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे बादशाह रहिमतुल्ला शेख यांना राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवक म्हणून 5 ऑक्टोबर,2024 रोजी हा पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला होता…
अकलूज येथील दर्गा मशीद कमिटी यांच्या वतीने बादशाह शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हुसेनभाई शेख,सलीम सय्यद,खलील तांबोळी,रशीद शेख,इब्राहिम शेख आणि खुद गब्बर छोटा जावेद बागवान उपस्थित होते…
हा पुरस्कार युरोपियन देशाचे भारतातील राजदूत डॉ जेनीस दरबारी,उत्तराखंड चे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत,नूपुर मेहता,सिने अभिनेत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला…
कार्य- 2005 पासून पंतप्रधान रोजगार योजने अंतर्गत कर्ज उपलब्ध करून शेकडो तरुणांना व्यवसाय उभे करून दिले.2007 साली मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज पुरवठा करून मागासलेल्या अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे केले.अण्णाभाऊ साठे महामंडळ मार्फत अति मागास विद्यार्थ्यांना लोन उपलब्ध करून दिले…अण्णासाहेब पाटील महामंडळा मार्फत मराठा समाजातील बेरोजगारांना कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले…
कोरोना काळात गोरगरिबांना धान्य वाटप केले,कोरोनाग्रस्थ लोकांना दवाखान्यात बेड उपलब्ध करून दिले,रेमेडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून दिले…विधवा महिलांसाठी शिलाई मशीन उपलब्ध करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले.दुष्काळग्रस्त लोकांच्या जनावरांना चारा उपलब्ध करून दिला…
लहान मुले,स्त्रिया,अति गरीब मुले,वृद्धांना मोफत दवाखान्याची सोय उपलब्ध करून दिली.मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मार्फत शैक्षणिक कर्ज,अति गरीब मागास विद्यार्थ्यांना कर्जाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांना डॉक्टर्स इंजिनियर्स बनवले…
अति गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य शाळेचा गणवेश,वह्या,पुस्तके इत्यादी उपलब्ध करून दिले.अल्पसंख्यांक समाजातील महिलांना एकत्र करून उद्योगधंद्यासाठी स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले…
सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी महिलांचे मेळावे घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.सरकारच्या विविध अल्पसंख्यांक योजनांचा लाभ अति गरजू लोकांना उपलब्ध करून दिले…
बादशहा शेख यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे…

Discussion about this post