धाराशिव प्रतिनिधी. अनिकेश विधाते 7083401323

धाराशिव विधानसभा निवडणुक जवळ आल्याने भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विकास कामांचा वेग वाढवला आहे.
आज दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी कौडगाव (बार्शी हद्द) ते बोरफळ आणि तीर्थक्षेत्र तुळजापूर ते तीर्थक्षेत्र तेर या दोन मार्गावरील ६२५ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
हा नवीन रस्ता बार्शी हद्द येथून सुरू होणार असुन धाराशिव शहर , संजा, पाडोळी , चिखली मार्गे औसा तालुक्यातील बोटफळपर्यंत जाणार आहे . तर दुसरा रस्ता तुळजापूर ते तेर पर्यंत जाणार आहे . हा रस्ता राज्याचे उपमुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजुर झाल्याचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले..
Discussion about this post