पूर्वी च्या काळात सरकारी नोकरीला विशेष प्राधान्य दिले जायचे इव्हन एखाद्या कुटुंबामध्ये मुलींसाठी स्थळ शोधण्याची मोहीम जरी सुरु झाली तरी मुलगा सरकारी नोकरीमध्ये आहे का हा पहिला कॉलोमचं असायचा पण कालपरत्वे सरकारी नोकऱ्यांची संख्याही कमी झाली त्याप्रमाणे खाजगी कंपन्यांमध्ये तरुण भरती होऊ लागले मात्र भारतामधील अंबानी अदानीं टाटा यांच्या सारख्यांचे आदर्श घेऊन अलीकडची तरुण पिढी आता स्वावलंबनचे धडे गिरवू लागली आहे. मिरजमधील असाच एक ध्येयवेडा कोळी कुटुंबातील तरुण ओम. ओम चे कुटुंब तसे मध्यमवर्गीय वडील अर्जुन कोळी यांचा व्यवसाय फिरतीचा मात्र ओम ला लहानपणापासून स्वतःच्या पायावर उभारायचे धडे वडलांनी दिले त्याप्रमाणे ओम मिरजेतील एका प्रसिद्ध सराफी दुकानात कामालाही लागला हळूहळू या दुकानातून त्याने सोन्या चांदीच्या दागिने विक्रीचे कौशल्य आत्मसात केले आणि आज स्वतः चे एक नदीवेस परिसरात दुकानही सुरु केले. ‘ओमसाई ज्वेलर्स’ नावाने सूर केलेले दुकान म्हणजे त्याने त्यांच्या यशाच्या शिखरावर ठेवलेले एक पाऊलच म्हणावे लागेल. दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याने उभा केलेल्या या व्यवसायाचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. ओम च्या या यशाचे त्यांनीही भरभरून कौतुक केले. आज ओम शी आमच्या प्रतिनिधीनि संपर्क साधला असता तो म्हणतो या माझ्या यशामध्ये माझे आई वडील आणि मी जिथे आजपर्यंत काम केले त्या दुकानाचे मालक यांचाही मोलाचा वाटा आहे. आज झालेल्या त्यांच्या दुकानाच्या उदघाटनावेळी काँग्रेस पक्षाचे नेते संजय बापू मेंढे माजी सभापती निरंजन आवटी जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समिती कदम प्रवीण राजपूत राजेंद्र बरगाले आर पी आय चे संतोष जाधव यांच्यासह मान्यवरांची मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि ओम ला आशिर्वादही दिले. ओम चे आई आणि वडील सौ सौ व श्री अर्जुन कोळी यांनी सर्वांचे स्वागत आणि आभार मानले
Discussion about this post