
भाजपा नेते विजयराव जाधव यांचे आज दि.१३ आक्टोबर रोजी दिर्घ आजारामुळे निधन झाले आहे.विजयराव जाधव यांनी आपल्या हयातीत बहुजन समाजासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती. मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष असतांना त्यांनी केलेले कार्य मलकापूर शहरातील जनता कधीही विसरू शकत नाही.तसेच बुलढाणा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे.सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचेही ते अध्यक्ष होते.शिवजयंतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली सर्वधर्मसमभावाची भावना बहुजन समाजात रुजविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.त्यांच्या निधनामुळे मलकापूर शहरात शोककळा पसरली असुन सर्व जाती धर्माचे लोक हळहळ व्यक्त करत आहेत.
Discussion about this post