परंडा तालुका प्रतिनिधी:- परंडा तालुक्यातील वाटेफळ येथे गावचे माजी उपसरपंच संतोष आबा भांडवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील हनुमान मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सलग चार वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेल्या या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद देत शिबिरामध्ये एकूण 45 जणांनी रक्तदान केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे गावातील युवकांनी व ग्रामस्थांनी रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिरासाठी कुर्डूवाडी ब्लड बँक कुर्डूवाडी चेअधिकारी सोमनाथ चव्हाण यांनी स्वतः उपस्थित राहून सहकार्य केले.
गावातील भालचंद्र भांडवलकर, किरण भांडवलकर, महादेव जाधव, बिभीषण भांडवलकर, आजिनाथ मोहिते, नामदेव गिरवले, बळीराम भांडवलकर, आप्पा भांडवलकर, उल्हास भांडवलकर, पोपट कोकाटे, राम नुसते, देव भांडवलकर, युवराज भांडवलकर, राहुल पाटील, नाना पाचविले, सतीश भांडवलकर, जयसिंग भांडवलकर, राहुल भांडवलकर, प्रवीण कदम, अजित नुसते, आजिनाथ भांडवलकर, दयानंद भांडवलकर, विष्णू गिरी, लक्ष्मण लांडे, दत्तात्रय भांडवलकर, भारत भांडवलकर, रणजीत भांडवलकर, तात्या झोरे, विलास भांडवलकर, बापू काका भांडवलकर, हरिदास भांडवलकर, सेवक देवकते, ब्रह्मदेव भांडवलकर, हनुमंत साळवे, सुजित भांडवलकर, बालाजी भांडवलकर, रवींद्र तांबे,यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
वाढदिवसानिमित्त उपसरपंच संतोष आबा भांडवलकर यांचा सत्कार गुरुवर्य धर्मराज दादा महाराज सामनगावकर यांनी केला.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण मला फोन करून, मेसेज द्वारे, प्रत्यक्ष भेटून शुभेछा दिल्या तसेच रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आपला स्नेह असाच वृद्धिंगत व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो अशी भावना संतोष आबा भांडवलकर यांनी व्यक्त केली.
Discussion about this post