
भिगवण : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असे असले तरी एका मित्रानेच आपल्या मित्रांची निर्घृण हत्या केली आहे. भिगवण येथील मदनवाडी गावच्या हद्दीत 45 वर्ष वयाच्या एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
विजयकुमार विठ्ठलराव काजळे, (वय 45, रा. निरगुडे)
असे मृत तरुणाचे नाव.
डोक्यात दगड घालून मित्रानेच केली हत्या, हत्या करणाऱ्या आरोपी मित्राला भिगवण पोलिसांनी अटक केले आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत मौजे मदनवाडी गावातील माळरानावर मृत व्यक्ती विजयकुमार काजळे आणि त्याचा मित्र राज भगवान शिंदे, (वय 20 वर्षे रा. मदनवाडी) हे दोघे रात्री एकत्र बसले होते. एकत्र बसले असताना कोणत्यातरी कारणावरून त्याच्यात वादाला ठिणगी पेटली दोन्ही मित्रांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन भांडण टोकाला गेले आरोपी राज शिंदे याने विजयकुमार काजळे याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला.
सदर मृतदेह पुढीलकार्यवाहीसाठी भिगवन येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आला.
सदर घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेत भिगवण पोलिसांनी आपला तपास सुरू केला व आवघ्या काही तासांच्या आत आरोपीला शोधुन ताब्यात घेतले. सदर खुनाचा गुन्हा दाखल
करण्याचे काम सुरु असून अधिकचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Discussion about this post