शिरूर अनंतपाळ/.प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अजनी (बु) जि.प.शाळेतील सहशिक्षक दत्तनगिरे राम बाबुअप्पा यांचा वाढदिवस विघार्थ्यासोबत साजरा करण्यात आला. कोणीही आपला वाढदिवस आपल्या कुटूंबियासोबत कुटूंबात साजरा करतात. या शिक्षकानी माझी शाळा, माझे विद्यार्थी हेच माझे कुटूंब समजून आगळ्या वेगळ्या पद्धतीने शाळेत विद्यार्थ्यासोबत आपला वाढदिवस साजरा केला.
शाळा व विद्यार्थी यांच्या वतीने सरांचे स्वागत करून त्यांचे अभिष्ठचिंतन करून सर्वानी शुभेच्छा दिल्या . सरांनी शाळेतील सर्वच मुलांना पेन, वही, गोड खाऊ यांचे वाटप केले . विशेष करून शाळेतील मुलांनी सरांसाठी स्वत: गुच्छ तयार करून आणले होते . कार्यक्रमांचे प्रास्ताविक व संचालन उमाकांत काळे यांनी केले . तर शुभेच्छा संदेश मु.अ. अनंत डोंगरे, विजय कोरे यांनी दिले.यावेळी सहशिक्षक माधव सूर्यवंशी, सुनिता कलमे, हुशेन बागवान, गोंविद शिंदे हे उपस्थित होते.
Discussion about this post