गेवराई प्रतिनिधी (दिलीप महानोर )
विधानसभेची निवडणुकीची पडघम वाजत असतानाच गेवराई विधानसभा मतदारसंघात ओबीसी कडून रासप जिल्हाध्यक्ष प्रसिद्ध कीर्तनकार परमेश्वर महाराज वाघमोडे सरांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात जोरात होत आहे ,काहीच दिवसांवर निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नेते मंडळाची धावपळ सुरू झाली . माजी मंत्री रा स प संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी महायुतीतून फारकत घेत स्वबळावर उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे, मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबीसी महायुतीवर नाराज आहेत,
त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची मोठी कोंडी झाली असून, तिकीट मिळाल्यानंतर महायुतीतील पक्षात डॅमेज कंट्रोल करणे अवघड होणार आहे त्यामुळे मराठा ओबीसीच्या भूमिकेवर महाराष्ट्र राज्यातील राजकारणाची मोठी उलथापालथ होणार आहे,
गेवराई विधानसभा मतदार संघ हा नेहमीच चर्चेत राहिलेला मतदार संघ आहे सध्या मराठा ओबीसी संघर्ष पेटलेला असतानाच निवडणुकीचे महत्त्व प्राप्त झाले आहे त्याच ओबीसी चा उमेदवार निवडणुकीत उतरल्यास ओबीसी मतदार एकीकडे गेल्यास राजकारणाचे समीकरण बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
परमेश्वर महाराज वाघमोडे रासप व कीर्तनाच्या माध्यमातून सुपरिचित आहेत, सर्वसामान्यात मोठा जनसंपर्क व सर्वसाधारण लोकांचे हित जोपासणारा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, गेवराई विधानसभा मतदार संघातून ओबीसी उमेदवारी मिळावा म्हणून अनेक जणांनी ओबीसी नेत्याकडे गळ घातल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे, सामाजिक उपक्रम राबऊन त्यांनी तालुक्यातील अनेक गावात कार्यक्रम घेत लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
सक्रिय राजकारणा बरोबरच समाजकार्यात अग्रेसर असणारे परमेश्वर महाराज वाघमोडे सतत जनतेच्या सुखदुःखात सहभागी असणाऱ्या नेत्याची छबी त्यांच्यात आहे.गेल्या वेळी गेवराई विधानसभा मतदारसंघात टाळ मृदुंगात निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करत मतदार संघात लक्ष विचलित केले होते, तेव्हापासून त्यांनी विधानसभा निवडणुकीत उभा राहून निवडून येण्यासाठी जनसंपर्क वाढवला होता. मोठ्या जनसंपर्कावर ओबीसीच्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी वर भर देत दांडगा जनसंपर्क वाढवला आहे.
Discussion about this post