सुरेगाव रस्ता परिसरात पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उत्पादनात् प्रचंड घट झालेली असताना जेमतेम असलेले पिक काढणीला आलेले असतांना गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या सुरेगाव रस्ता परीसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे पिकासाठी जिवापाड मेहनते कुरूण काढणीला आलेले पिक वाया जात असलेले बघतांना शेतकरी बांधव हतबल झाले आहे.
सूरेगाव रस्ता परिसरात देवळाणे गवंडगाव खामगाव, देवठाण, भुलेगाव, दुगलगाव आदी गावांत मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे परंतु चार दिवसापासून पावसामुळे लावलेले कांदे वाहूण गेले आहे कांदा, रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुभाव होऊन उत्पादन घट झालेली दिसून येत आहे
चार दिवसापासून पडल असलेल्या पावसामुळे कांदा, मका, कपाशी ह्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने पंचनामे करुण तातडीची मदत दयावी अशी मागणी परिसरातून होत आहे.
Discussion about this post