प्रतिनिधी पांडुरंग गाडे
खेड :
श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर भक्तनिवास कामासाठी 1 लाख25 हजार रुपये, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर मंदिराच्या बांधकामासाठी 1 लाख25 हजार रुपये, श्रीक्षेत्र कुठे ईश्वर मंदिर बांधकामासाठी 1 लाख 25 हजार रुपये, ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिराच्या बांधकामासाठी 2 लाख 50 हजार रुपये, श्री संत तुकाराम महाराज विसावा मंदिर बांधकामाला 03 लाख 91 हजार रुपये ची देणगी देण्यात आली.
सोनाबाई मारुती देवकर यांच्या दुसऱ्या विधीच्या निमित्ताने त्यांचे असणारे पुत्र प्रगती शेतकरी दत्तात्रय देवकर ,ज्ञानेश्वर देवकर, शिवाजी देवकर, व त्यांच्या असणारे नातू खेड तालुका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुनील देवकर, उद्योजक राजाराम देवकर, यांनी वरील प्रमाणे देणगी धार्मिक कामासाठी दिली आहे.
ही देणगी पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शरद राव बुट्टे पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अशोकराव खांडेभराड, माजी उपसभापती अमोल दादा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, राजगुरुनगर बँकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय भेगडे, माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर,
अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख विनोद महाळुंकर , माजी नगरसेवक आबा बागल,चांगदेव शिवेकर, रोहिदास गडदे, उप तालुका प्रमुख सुभाष मांडेकर, सरपंच सायली टेमगिरे, संजय गोंधळ, मोहन पवार, रोहिदास डावरे, अमोल पानमंद, विठ्ठल थाटे, मेजर दत्तात्रय टेमगिरे, सरपंच सुरेश पिंगळे, या मान्यवरांच्या शुभहस्ते ह भ प बाळशीराम महाराज मिंडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
या मातेच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने खेड, मावळ ,हवेली, तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातून अनेक गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post