खेड तालुका प्रतिनिधी
पांडुरंग गाडे
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुती चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून महाविकास आघाडीकडून त्यांच्याविरुद्ध कोण उमेदवार असेल अशी चर्चा सध्या खेड तालुक्यांमध्ये रंगत आहे.
आमदार दिलीप मोहिते यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कोट्यावधीची कामे मतदार संघात आणल्यामुळे आणि अनेक विकास कामे केल्याचा दावा आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खेड तालुक्यातील जनता मला पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी देईल अशी आशा आमदार दिलीप मोहिते पाटील यांना आहे.
तसेच खेड तालुक्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपद देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जनतेला दिले आहे.
आणि महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री अतुल देशमुख राष्ट्रवादीचे युवा नेते सुधीर मुंगसे हे इच्छुक असून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी शेठ काळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोकराव खांडेभराड माजी पंचायत समिती सदस्य अमोल दादा पवार इच्छुक असून यापैकी हा मतदार संघ कुठल्या पक्षाला सुटतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे . महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षाला जागा सुटल्यास आणि आमच्यापैकी कुठल्याही एका कार्यकर्त्याला उमेदवारी भेटल्यास त्या एका उमेदवाराचे काम सर्व इच्छुक उमेदवार एकजुटीने करणार असल्याचे खेड तालुका शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार श्री अमोल पवार यांनी सांगितले.
Discussion about this post