रांजणगाव गणपती प्रतिनिधी :बाळासाहेब कुंभार
शारदीय नवरात्र उत्सव म्हणजेच घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमा या उत्सव काळात कोजागिरीला हा पोत सोहळा तुळजापूर येथे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला .
तुळजाभवानी पोत सोहळा ,जय भवानी पोत सोहळा , अखिल होळी मैदान पोत सोहळा यांचा यामध्ये सहभाग असतो .
ढोल ताशाच्या गजरात व अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज चौक ( लोहिया धर्मशाळा )येथे सुरू होऊन तुळजाभवानी मातेच्या मंदिरात याची सांगता झाली .
सोलापूर येथील मानाच्या काठ्याच्या पुढे हा सोहळा असतो व मानाच्या काट्यांचा कार्यक्रम नंतर होतो यात्रा काळात मंदिर परिसर हा सुंदर अशा फुलांनी सुशोभित केलेला होता.
तुळजापूर मध्ये अंदाजे दोनशे ते सव्वा दोनशे वर्षापासून ही परंपरा सुरू असल्याचे जय भवानी पोत सोहळा अध्यक्ष बाळासाहेब ढमढेरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
हा सोहळा पाहण्यासाठी महिला व भाविक भक्तांनी तसेच तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थांनी मोठीगर्दी केली होती तसेच दसऱ्याच्या दिवशी हा पोत सोहळा तळेगाव ढमढेरे येथे ही अतिशय भक्तिमय वातावरणात होत असतो.
Discussion about this post