
प्रतिनिधी :- सुरेंद्र जाधव..
दिनांक 15 मार्च 2025 सकाळी 11.00 वाजता गाव दाभे मोहन ह्या ठिकाणी केलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा व नवीन कामांचा शुभारंभ आयोजित केलेला आहे.परदेशात राहून देखील आपल्या मायभूमी बद्दल विशेष आपुलकी असणारे व समाजाप्रती दातृत्व भावना असणारे दाभे गावचे सुपुत्र श्री.चन्दन राजाराम चव्हाण यांनी आपल्या गावात काही महिन्यापूर्वी फिल्टर द्वारे १०० % पाणी शुद्धीकरण करणारे सातारा जिल्यातील पहिले गाव तसेच गावातील वाडी वस्तीतील पायवाटा व रस्त्यावर सौर उर्जेवर चालणारे पथदिवे लावणारे सातारा जिल्यातील पहिले गाव अशा या दाभे गावात शासकीय व सामाजिक कामांचा लोकार्पण सोहळा व नवीन कामांचा शुभारंभ सोहळा आयोजित केला आहे.यावेळी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री.मकरंद आबा पाटील यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा व नवीन कामाचा शुभारंभ सोहळा होणार आहे .
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. नितीन काका पाटील- राज्यसभा खासदार ,श्रीमती. याक्षणी नागराजन – भा. प्र. से. मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद ,श्री राजेंद्र सेठ राजपुरे -संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ,श्री संजू बाबा गायकवाड – मा सभापती पंचायत समिती, मा. सौ. तेजस्वीनी पाटील – तहसीलदार महाबळेश्वर आदी उपस्थित राहणार आहेत तसेच तालुक्यातील राजकीय नेते ,सामाजिक कार्यकर्ते ,उधोजक ,पत्रकार,शिक्षक ,सरपंच ,पोलीस पाटील आणि इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
“आपल्या ग्रामीण भागातील इतर गावांमध्ये सौर उर्जेवर चालणारे एका वर्षांमध्ये ९५ पथदिवे लावले असून आणखी असे उपक्रम मी दिव्याच्या वाती प्रमाणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रकाश उजळत राहण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणार आहोत असे नव नवीन उपक्रम समाजासाठी माझ्या हातून येणाऱ्या काळात होत राहतील आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने हि कामे माझ्या कष्टकरी माणसापर्यंत जावोत हीच माझी सदिच्छा आहे” . तरी या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण सर्वानी माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी १०५ गाव विभागातील जनतेला माझी आदरपूर्वक विनंती आहे – श्री चंदन राजाराम चव्हाण..
Discussion about this post