
आजरा – तालुका प्रतिनिधी,
राधानगरी – आजरा – भुदरगड विधानसभा मतदारसंघाच माजी आमदार के.पी. पाटील यांनी बुधवारी शिवसेना ठाकरे गटाची मशाल हाती घेतली त्यांनी मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला.
त्यानंतर आजरा राधानगरी – भुदरगड मधून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार के.पी. पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.
यावेळी पाटील गटाचे कार्यकर्ते व आजरा शिवसेना ठाकरे गटाचे संभाजी पाटील व त्यांचे कार्यकर्ते मुंबईत मातोश्री वर उपस्थित होते.
Discussion about this post