भोकर प्रतिनिधी राजकुमार पांचाळ 9657978196
दि. 23 आक्टों. आत्ताच हाती आलेल्या विश्वसनिय वृत्ता नुसार महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर झाली असून 85 भोकर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून तिरूपती उर्फ पप्पू पाटील कौंढेकर आणि नायेगाव विधानसभा मतदार संघातून मिनलताई खतगावकर यांचे नाव घोषीत करण्यात आले आहे.
सन २०२४ च्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्वी काॄग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या 85- भोकर विधानसभा मतदारसंघात विविध पक्षांकडून उमेदवारांची नावे निश्चित होत असतानाच महाविकास आघाडी काँग्रेस पक्षा कडून अर्धापूर तालुक्यातील भुमीपुत्र तिरुपती उर्फ पप्पू पाटील याच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे. आजपर्यंत भोकर विधानसभेत काँग्रेस पक्षाचा पगडा होता. परंतू काँग्रेस पक्षाचे वडीलोपार्जीत निष्ठावंत समजले जाणारे खा. अशोकराव चव्हाण साहेब या मतदार संघाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप वाशी झाले आहेत. एवढेच नाही तर ते भाजपचे तिकीट आपली मुलगी श्रीजया चव्हाण यांच्यासाठी मिळवून घेतली. श्रीजया ताईंच्या विरोधात काँग्रेस कडून लढण्यास ईच्छूक असलेले इंजि. दामीनीताई ढगे, कृषी सभापती बाळासाहेब पा. रावनगावकर, हे सुद्धा चर्चेत असलेली नावे होती. पण पक्षाने मात्र स्थानिक जनतेचा कौल पाहून पप्पू पाटील कौंढेकर यांना संधी दिली आहे. या आगोदर वंचित बहूजन आघाडी कडून रमेश राठोड यांना तिकीट मिळाले आहे.
तसेच विधानसभेमध्ये मराठा आरक्षण योध्दा श्री मनोज जरांगे पाटलांच्या कडूनही उमेदवार उभा करण्याची तयारी चालू आहे. त्यामुळे भोकर मध्ये कीती रंगी लढत होईल याकडे जनतेचे लक्ष आहे.


Discussion about this post