
आजरा – तालुका प्रतिनिधी
प्रांतीय व भाषिक सलोखा जपण्याच्या व वृद्धिंगत करण्याच्या हेतूने आजरा महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. अशोक बाचुळकर यांनी हिंदी – मराठीत लिहीलेल्या व भाषांतरीत केलेल्या साहित्यावर बनारस (काशी) हिंदू विद्यापीठात संशोधन हाणार आहे. डॉ. अशोककुमारज्योती यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पार पडणार आहे.
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील हिंदीच्या प्राध्यापकांच्या साहित्यावरती अशा प्रकारचे संशोधन पहिल्यांदाच होत आहे. आजरा तालुक्यातील ‘मृत्युंजयकार ‘ शिवाजीराव सावंत यांच्यानंतर बहुमान डॉ. अशोक बाचुळकर यांना मिळाला आहे. आज अखेर त्यांचे चार समीक्षा ग्रंथ, दोन कथा संग्रह, चौदा भाषांतरीत कविता व संग्रह सहा संपादित ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
त्यांच्या संपूर्ण साहित्यावरती बनारस हिंदू विद्यापीठात संशोधन होणार आहे. त्यांनी लिहीलेल्या नाटक कार भीष्म साहनी या समीक्षा पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे त्यांनी हिंदीत भाषांतरीत केलेल्या .’जलते हुए पेड और पंछी ‘ या काव्यसंग्रहाला मामा वरेरकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. अनेक राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय चर्चासत्रांत त्यांनी शोधनिबंधाचे सादरीकरण केले आहे. राष्ट्रीय स्तरावर अनेक चर्चासत्रांचे आयोजन त्यांनी केले आहे.
Discussion about this post