मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : सध्या आपल्या मतदारसंघात एक फोटो आणि त्यासोबतचा मजकूर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोविषयी खूप चर्चाही रंगल्या आहेत. मी वाशिम जिल्हा परीषद गटनेता लोकप्रतिनिधी असल्याने, काही विरोधी लोक या प्रसंगाचा चुकीचा अर्थ लावून, समाजात अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी, वास्तव काय आहे ते समजून घेणे महत्त्वाचे आहे.
ॲड.ज्ञायक पाटनी आणी मी पाटनी यांचे जवाई यांच्या आॉफीस मध्ये चाललो होतो खा.देशमुख साहेब हे रेल्वे स्टेशन ला चालले होते
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी खा.संजय देशमुख व कॕपटन प्रशांत सुर्वे पाटील हे समोर आले असता त्यांना मान देणे हे आमचे कर्तव्य होते हे आपल्या संस्कृतीला धरुन आम्ही चहा घ्यायला गेलो खा.संजय देशमुख मतदारसंघातील कोणताही व्यक्ती भेटू शकतो,
मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला तरी त्याचा सन्मानपूर्वक आदर करणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे. आपली भारतीय संस्कृती देखील याच शिकवणीवर आधारलेली आहे—सर्वांशी समानतेने आणि आदराने वागणे.
विरोधकाने विरोध करायची पातळी सोडली आहे त्यांच्याकडे दुसरे काम राहीले नाही.
आम्हाला चर्चा करायची असती तर बंदव्दार केली असती ओपन मध्ये बसलो नसतो फोटो काढणारा व्यक्ती ला हेच सांगु इच्छितो की आम्ही यापेक्षा चांगली पोज दिली आसती
दुर्दैवाने, सध्या काही विरोधक राजकीय हेतूने या भेटीचे वेगवेगळे चुकीचे अर्थ लावून समाजात गोंधळ पसरवत आहेत. कृपया अशा खोट्या प्रचाराला बळी पडू नका. अशा प्रकारच्या अफवांचा उद्देश लोकांमध्ये फूट पाडणे आणि विकासाच्या प्रक्रियेपासून लक्ष विचलित करणे असतो.
आपल्याला सर्वांना विनंती आहे की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.असे मत वाशिम जिल्हा परीषदचे गटनेते तथा जिल्हा मध्यवर्ती बॕक संचालक ऊमेशभाऊ ठाकरे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले
Discussion about this post